Top Post Ad

गांधीज किलर्स, इंडियाज रुलर अर्थात गांधीजींचे मारेकरी, भारताचे शासक


 माझे वडील RSSचे कट्टर सेवक होते. माझ्या वडीलांवर खुद्द गोलवलकरांनी बंगालमध्ये जाऊन आरएसएसची विचारधारा रुजवण्याचे कार्य सोपवले होते. त्यामुळे साहजिकच मीही लहानपणापासून आरएसएसच्या शाखेत जात होतो. मात्र माझ्यासोबत असणाऱ्या एका मुलाला त्याचे नाव अहमद असल्यामुळे अनेकवेळा मारहाण करण्यात आली. यासह अशा अनेक घटनांचा  माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि मी आरएसएसपासून दूर झालो. मी स्वत: आरएसएसचा एक भाग राहिल्याने त्यांचा सामाजिक भेदभाव मी जवळून पाहिला आहे. या सर्व गोष्टी मी या आधी देखील एका पुस्तकात अंतर्भूत केल्या आहेत. त्याचाच पुढील भाग गांधीज किलर्स इंडियाज रुलर अर्थात गांधीजींचे मारेकरी भारताचे शासक हे पुस्तक आहे. या  पुस्तकात आरएसएसचे एक ज्वलंत चित्र रेखाटण्यात आले आहे आणि भारतीय समाजाची विविधता आणि चैतन्य धोक्यात आणणारी एक राक्षसी प्रवृत्तीचे चित्रण करणारे एक भडक प्रभावी रूपक वापरले असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते डॉ.पार्थ बॅनर्जी यांनी दिली.

गांधीज किलर्स इंडियाज रुलर या आपल्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन डॉ.पार्थ बॅनर्जी  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केले.  फोरम फॉर डेमॉक्रॉसी अॅन्ड कॉम्युनल अॅमिटी ( FDCA) आणि ऑल इंडिया सेक्यूलर फोरम (AISF) या संघटनांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध विचारवंत डॉ. राम पुनियानी तसेच डॉ.विवेक कोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साकीर भाई यांनी केले.

या पुस्तकात माझे अनुभव, त्यांचे कथन गंभीरपणे व्यापकपणे वैयक्तिकरित्या मांडले आहेत. हे काम विशेषतः भूतकाळातील संलग्नतेच्या त्रासदायक पैलूंना तोंड देण्याच्या धाडसासाठी आणि RSS च्या गुंतागुंतीच्या यंत्रणेमध्ये ज्या खोलवर जाते त्याबद्दल उल्लेखनीय आहे.  आंतरिक दृष्टीकोन भारतीय समाज आणि राजकारणावर खोलवर परिणाम करणाऱ्या या संस्थेच्या कार्याची खरी बाजू जी माझ्या अनुभवातून आली आहे ती मांडण्याचा मी प्रयत्न केला आह. विशेष म्हणजे, हे पुस्तक आरएसएसच्या “सात पापांचे” विच्छेदन करते, त्याची फसवणूक, असहिष्णुता आणि सत्तेसाठी आक्रमक प्रयत्नांचे परीक्षण करते. हे सुस्पष्ट, सर्वसमावेशक आणि विचार करायला लावणारे कथन माझ्या धैर्य, प्रामाणिकपणा आणि सत्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे, ज्यामुळे आधुनिक भारताची गुंतागुंत समजून घेऊ इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी "गांधीचे किलर्स इंडियाचे शासक" हे वाचनीय आहे. हे पुस्तक ऑनलाईनवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असून ते मोफत डाऊनलोड करता येत असल्याची माहितीही बॅनर्जी यांनी दिली.   

हा भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्याचा एक आकर्षक आणि सखोल शोध आहे, सध्याच्या राजकीय मंडळीपासून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येणारी २०२४ची लोकसभेची निवडणुक कदाचित शेवटची ठरणार आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी आज लोकाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. माझे वडिल आणि मी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होतो. परंतु संघाचा खरा चेहरा ज्यावेळी कळाला त्याचवेळी त्याची नाळ तोडली. कारण संघाची रणनिती येथील देशाला आणि येथील जनतेला गुलाम करणारी आहे आणि हे घातक आहे. त्यासाठी येथील जनतेने सावध झाले पाहिजे. आणि वेळीच या विरोधी जनआंदोलन करण्याची गरज असल्याचेही बॅनर्जी म्हणाले.

यावेळी डॉ.राम पुनियानी म्हणाले कि, लोकांनी जागृत होण्याची गरज आहे. येथील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, दलित, महिला, अगदी युवापिढी हेही धोक्यात आहे. आणि ह्या सर्वांच्या मुळाशी आर एस एस आणि भाजप जबाबदार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन येत्या निवडणुकीत त्यांना हद्दपार करण्याची गरज असल्याचे सांगितले. आरएसएसची निर्मिती नागपूरात झाली. जे ठिकाण हिन्दुबहुल आहे. त्या ठिकाणी कोणतेही मुस्लिम शासन नव्हते. मग त्यामागे कारण काय होते. याचीही आपण विचारमिमांसा केली पाहिजे. आज या संघटनेने संपूर्ण देश ताब्यात घेतला आहे. आणि तो केवळ हिन्दू या भावनिक शब्दाद्वारे. मात्र खरेच आरएसएसला भारत हिन्दू राष्ट्र बनवायचे आहे का? हे आता अधिकाधिक लोकांना माहिती झाले आहे. त्यामुळेच त्यांनी आता राम नाम जपण्यास सुरुवात केली. ज्यांना आरएसएसचे हिन्दुत्व काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल त्यांनी गोलवलकरांचे थॉट्बंच वाचावे. त्यांना आरएसएसचे हिन्दूत्व कळेल. मात्र येथील तमाम लोकांच्या मेंदूचा ताबा घेण्यात आज आरएसएस यशस्वी झाली आहे. म्हणून भारताची संवैधानिक लोकशाही आज धोक्यात आली आहे. यासाठी सर्व भारतीयांनी एकजुटीने या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. तरच येणाऱ्या काळात भारताची लोकशाही टिकून राहिल अशी खंत पुनियांनी यांनी यावेळी व्यक्त केली. 

आरएसएस ही केवळ मुस्लिम विरोधी नाही तर इथल्या पिडीत, दलित तसेच महिलांविरोधी देखील आहे. या साऱ्या घटकांवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत. मात्र इथल्या दलित पिडीतांवर अत्याचार झाल्यास त्याचा विरोध किंवा त्याविरोधात आंदोलन दलितच करतात. कधी आपण पाहिलं आहे का इथल्या दलितांवर अत्याचार झाल्यानंतर समाजातील  इतर घटक कधी त्याच्या मदतीला गेलेला आहे. अशी विषम परिस्थिती भारतात असल्यानेच आपण गुलाम झालो आहोत. जोपर्यंत आपण आपली एकजूट दाखवत नाही तोपर्यंत हे अन्याय अत्याचार थांबणार नाहीत असे स्पष्ट मत डॉ.विवेक कोरडे यांनी यावेळी मांडले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com