लहुजी कांबळे यांनी स्व:ताच्या मालकीचा बंगला भारतीय बौद्ध महासभा अर्थात दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाला दान केला, संस्थेच्या वतीने
डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी त्याचा स्विकार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेवर विश्वास ठेवून स्वकष्टातून उभा केलेला बंगला डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाचा स्वीकार करून अधिकृत रित्या दान स्वरूपात दिला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणारा समाज उदात्त उंतकरणाने समाजहितासाठी तथागतांची दान पारमिता अंगिकारून एक आदर्श समाजाची ओळख निर्माण करत आहे. हे आंबेडकरी चळवळीचे यश आहे. तथागतांचा धम्म सर्व जंम्बूदिपात पोहचला आणि टिकून राहिला तो दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे हा इतिहास आहे...,_ दानशूर व्यक्तीमत्त्व आद. लहुजी कांबळे साहेब यांचा बंगला दान देण्याचा संकल्प गेल्या एक वर्षापासून झाला होता. त्यांनी स्वतः आद भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांची भेट घेऊन माझा बंगला मी तुम्हाला स्वच्छेने दान करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा क्रांतिवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. धनलक्ष्मी कुपवाड सांगली जिल्ह्यात वास्तव्यास असणारे आद लहुजी कांबळे यांच्या मालकीचा बंगला माळशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी असून हा बंगला दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नांवे कायदेशीर रित्या हस्तांतरित करण्यात आला आहे..लहुजी कांबळे यांचे नाव भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांने लिहिले जाईल...,
सदर बंगला समाज उपयोगी कार्यास वापरण्यात यावा. त्या ठिकाणी अभ्यासिका, ग्रंथालय, गरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी लाभ मिळावा यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचना डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. स दर कार्यास आद हणमंत जगताप गुरुजी, आद लोंढे गुरुजी, आद बाळासाहेब गायकवाड गुरुजी, आद आण्णासाहेब वाघमारे गुरुजी यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांच हि मनःपूर्वक आभार मानतो. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी निस्वार्थपणे हि वास्तु समाज उपयोगी कार्यासाठी देऊन समाजाचा नेता म्हणून सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे..
_आपला धम्म बंधू...,_
*मंगेश अडसुळे...,9833613374*
0 टिप्पण्या