आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कट्टयामुळे परिसरातील अनेक जातीसमुहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. तर प्रफुल वाघोले यांनी आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले व ज्योतिबा फुले यांनी ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केली.
आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधु-भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणीत केला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावे, अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वास जावी, यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावे, यासाठी पत्रव्यवहार केला होता. मागील वर्षी गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठान अध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपला शब्द खरा करुन निधी उपलब्ध करुन दिला. त्यांच्या विशेष निधीमधून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येत आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचा भूमिपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्यासह शिवसेना पक्ष प्रवक्ते नरेश म्हस्के, मा. नगरसेवक मनोहर डुंबरे, मा. नगरसेवक भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, विकास दाभाडे, ज्येष्ठ संपादक मधुकर मुळूक, जेष्ठ संपादक प्रमोद इंगळे, ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले मराठा सेवा संघ ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे, मा. नगरसेविका पुजा गणेश वाघ, यादव समर्थ अध्यक्ष जितेंद्र यादव, रामानंद यादव, नयना भोईर, रेखाताई कंटे, सचिन केदारी, सचिन शिंदे, किसन बोंदे्र, समीर भोईर, अक्षय कोळी, संतोष राणे, विशाल वाघ, रवि कोळी, अमित हिलाल, दिपाली कराळे, मेघनाथ घरत, अखिल भारतीय विश्वकर्मा समाजाचे बळीराम खरे, समता विचार प्रसारक मंडळाचे अजय भोसले, चंद्रकांत देसले, अनिल नलावडे, निलेश हातणकर, अमित पाटील, अजय जाधव यांच्यासह भारतीय समाजातील सर्व बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या