Top Post Ad

भारत जोडो न्याय यात्रेतील वाहनांवर हल्ला


  लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राहुल गांधी  यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सध्या ईशान्य भारतात सुरू आहे. या यात्रेला आसाम सरकार परवानगी देत ​​नाही तसेच यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे. अशातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश  यांनी आसाममध्ये भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. याबद्दलचे ट्वीट त्यांनी आपल्या एक्स अकांऊटवरुन केले आहे. सोबतच व्हिडिओही शेअर केला आहे. जो सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरूवात केली. ही पदयात्रा १८ जानेवारी रोजी आसाममध्ये दाखल झाली आहे. २५ जानेवारीपर्यंत ही यात्रा आसामच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. दरम्यान, आसाममध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेला भाजपाकडून विरोध होत आहे. रविवारी (२१ जानेवारी) आसामच्या सोनितपूर भागातील जमुगुरीघाट येथून ही यात्रा जात   भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींची बस रोखली. तसेच भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी हमरीतुमरीवर आले होते.  पदयात्रेवर हल्ला करणाऱ्या लोकांच्या हातात भाजपाचे  झेंडे होते. 

तसेच त्यांच्यापैकी काहीजण राहुल गांधी यांच्या बससमोर आले आणि त्यांनी बस थांबवली. बाहेर काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढला होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी बसमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बस थांबवायला सांगितली. त्यानंतर राहुल गांधी बसमधून उतरले आणि त्यांनी हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी पदयात्रा रोखणाऱ्या काही तरुणांनी पदयात्रेचं चित्रण करणाऱ्या एका ब्लॉगरचा कॅमेरा, ओळखपत्र आणि इतर उपकरणं हिसकावली. काँग्रेसने समाजमाध्यमांवर या घटनेची माहिती देताना म्हटलं आहे की, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण झाली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले.

"काही वेळापूर्वी सुनीतपूरच्या जुमुगुरिहाटमध्ये भाजपच्या लोकांनी माझ्या कारवर हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवर लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. आमच्यावर पाणी फेकत त्यांनी आमच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली.  मात्र आम्ही घाबरलेलो नसून मार्गक्रमण करतच राहू, आम्ही संयम राखला, गुंडांना माफ केले आणि तेथून पटकन पुढे निघालो. निःसंशयपणे, हे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा करत आहेत. - जयराम रमेश (ट्वीट)

राहुल गांधी यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून जात आहे. आज यात्रेचा चौथा दिवस आहे. राहुल गांधी नागाव जिल्ह्यातील कालियाबोर येथे रॅलीला संबोधित करण्यापूर्वी हा ह्‍ल्‍ला झाला. भाजप समर्थक राहुल गांधी यांच्‍या आगमनापूर्वी त्यांच्या मार्गावर मोर्चा काढत होते, तेव्हा भारत जोडो न्याय यात्रेची काही वाहने त्या भागातून जात होती. त्यानंतर त्यांनी काही वाहनांची तोडफोड केली आणि काँग्रेसच्या यात्रेतील पत्रकारांवरही हल्ला केला- माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि इतर काही लोकांची गाडी जमुगुरीघाटाजवळ मुख्य यात्रेत सामील होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यांच्या वाहनातील काँग्रेस जोडो न्याय यात्रेचे स्टिकर फाडले गेले. हल्लेखोरांनी गाडीवर भाजपचा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला आणि मागील काच जवळपास तोडली.यात्रेचे कव्हरेज करणाऱ्या व्लॉगरचा कॅमेरा, बॅज आणि इतर उपकरणे हिसकावून घेण्यात आली. पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्यांनाही मारहाण करण्यात आली,” अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या संपर्क समन्वयक महिमा सिंग 

‘आसामच्या लखीमपूर येथे शुक्रवारी रात्री भाजपच्या गुंडांनी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या वाहनांवर हल्ला केला आणि पक्षाचे पोस्टर आणि बॅनर फाडले. याचा तीव्र निषेध करतो. गेल्या दहा वर्षांत भाजपने देशातील न्याय आणि हक्क डावल्याचा आणि मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आसाममध्ये भाजपने न्यायाची आणि हक्काची ‘गॅरंटी’ पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला,  पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते अशा हल्ल्यांना आणि धमक्यांना घाबरणार नाहीत, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर लोकशाहीचे अपहरण झाले आहे. आसाम सरकारकडून धमक्या दिल्या जात असल्या तरी कार्यकर्ते घाबरणार नाहीत.’ - काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

‘आसामचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे भारत जोडो न्याय यात्रेने किती घाबरले आहेत ते पाहा. त्यांच्या गुंडांनी कॉंग्रेसच्या पोस्टरचे फाडले आणि वाहनांची देखील तोडफोड केली. यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री कोणत्याही थराला जाऊ शकतात.’ काँग्रेसच्या दाव्यानुसार, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पहिल्या यात्रेदरम्यान भाजपशासित राज्यांत फारसा त्रास झाला नाही, मात्र दुसऱ्या यात्रेत ईशान्य राज्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. क़ाँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com