Top Post Ad

रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)तर्फे जेष्ठ पत्रकारांचा सत्कार


 लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 6 जानेवारी पत्रकार दिन.  समाजात घडणाऱ्या प्रत्येक  घटनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अविरत काम पत्रकार हे  करीत असतात.अशा या अविरतपणे काम करणाऱ्या पत्रकारांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पक्ष (खोरीपा ) तर्फे मुंबई आझाद मैदान येथील खोरीप कार्यालयात सन्मान करण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाचे (खोरीपा) प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ निरभवणे व एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप या मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, वरिष्ठ क्राईम रिपोर्टर शिरीष वानखेडे, नवशक्ती वरिष्ठ पत्रकार रमेश औताडे आणि दैनिक सकाळ व नवराष्ट्रचे वरिष्ठ पत्रकार दिनेश मराठे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ निरभवणे, मुंबई अध्यक्ष भागवत कांबळे, कार्याध्यक्ष सलीम खतीब, सरचिटणीस विक्रांत पाटील,  रिपाई (आठवले ) कामगार नेते प्रकाश जाधव, जेष्ठ आंबेडकरी नेते रोकडे साहेब आणि पत्रकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com