महाराष्ट्राचे शासनाचे प्रचलित धोरण असतांना सुध्दा बेघर भाडोत्री कुटुंबाना न्याय मिळत नाही. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून आमचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, कोकण यांच्याकडे आजतागायत प्रलंबित आहे. तो प्रस्ताव तात्काळ मागवून मंजूर करण्यात यावा. या मागणीकरिता दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ-खानदेश नागरी सेवा संघ, रयत दलित स्वयंसेवक संघ मुंबई यांनी आज आझाद मैदान मुंबई येथे विराट आक्रोश मोर्चा आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे प्रमुख धनराज थोरात यांनी केले. यावेळी संघटनांचे पदाधिकारी राहूल कसबे, राजेंद्र पारवे, सुंदर खाडे, उज्वलाताई कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
बेघर, भाडोत्री कुटुंबाना हक्काचे घर बांधून राहण्यासाठी १०×३० ची जागा मिळण्याबाबत आझाद मैदान, मुंबई येथे आजपर्यंत आठ मोर्चे काढण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आठ मोर्चे काढण्यात आलेले आहेत व वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बेघर भाडोत्री सभासदांचा ३ वेळा मेळावे घेण्यात आले. महाराष्ट्र शासनाने बालाजी मंदिरासाठी उलवे गाव नवी मुंबई येथे २५ एकर जमीन मंजूर करुन सुध्दा बालाजी ट्रस्टीने १० एकर जमीनीची अजुन मागणी केलेली आहे. मग आम्ही कायद्याने मागणी करुन सुध्दा आम्हाला न्याय कोण देणार, कधी मिळणार ? रोटी,कपडा,मकान देण्याचा काम शासनाचे आहे.गेल्या अनेक वर्षापासून बेघर,भाडोत्र्यांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनराज थोरात यांनी यावेळी केला.
राज्य सरकारने खारेगाव,ठाणे येथील जिल्हाधिका-यांच्या हद्दीतील मोकळ्या व पडीक जागेवर बेघरांना,भाडोत्र्यांना कायमस्वरुपी व पक्की घरे द्या,दोन हजार बेघारांचा जमिनीचा प्रस्ताव मान्य करावा. मौजे खारीगांव ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. ७८/६, ७८/५, ६३/३०,६३/३१, ६३/२९,७८/७, ८५/१ अ या सर्वे नंबरच्या महाराष्ट्र शासनाच्या मोकळ्या पडीक जागेवर सदर ट्रस्टीच्या प्रत्येक सभासदांना १०४३० चे घर दांधून राहण्यासाठी सदरची २० एकर जमीन भाडेपट्टयाने मंजूर करण्यात यावी. मौजे उत्तर शिव ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. ५१, ६५, ७५ व १४ या सर्वे नंबरच्या महाराष्ट्र शासनाच्या मोकळया पडीक जागेवर सदर ट्रस्टीच्या प्रत्येक सभासदांना १०x३० चे घर बांधून राहण्यासाठी सदरची २० एकर जगीन भाडेपट्टयाने मंजूर करण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी रयत दलित स्वयंसेवक संघ या सामाजिक संस्थेने बेघर भाडोत्री १००० सभासदांना हक्काचे घर बांधून राहण्यासाठी ३३४३३ (१ गुंडा) प्रत्येक कुटुंबाला जमीन मिळण्यासाठी लातूर ते आझाद मैदान, मुंबई असा विराट मोर्चा / प्रचंड धरणे आंदोलन केले. लातूर येथील मौजे मुरुड अकोला सर्वे न. १९७, २१५, २६ तसेच मौजे निवळी सर्वे नं. ५९६ आणि मौजे गातेगांव सर्वे नं. १४३, मौजे माटेफळ सर्वे नं. २०३, आणि मौजे चिंचोली राववाडी यापैकी सरकारी पडीक मोकळ्या जमिनीवर बेघर भाडोत्री सभासद अर्जदारांना हक्काचे घर बांधून राहण्यासाठी ३३४३३ (१ गुंठा) जमीन प्रत्येक कुटुंबाला तात्काळ मिळावा. रयत दलित स्वयंसेवक संघ (RDSS) या सामाजिक ट्रस्टीच्या १००० बेघर भाडोत्री सभासद अर्जदारांना लातूर शहरात राबवित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत समाविष्ट करून घ्यावे. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
0 टिप्पण्या