Top Post Ad

"त्या" विचारांशी संबंधच नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत



  "एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतंय," अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी आमदार अपात्र प्रकरणी नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर नोंदवली. यावरुन  खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा उल्लेख करत घराणेशाहीवरुन शिंदेंनाच लक्ष्य केलं. तसेच भारतीय जनता पार्टीमधील अनेक कुटुंबांचा थेट उल्लेख करत शिंदे यालाही घराणेशाही म्हणणार का असा सवालही उपस्थित केला आहे. घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना आजच्या 'सामना'मधील लेखात लक्ष्य करण्यात आले आहे. "राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘‘हा घराणेशाहीचा पराभव आहे.’’ हे सांगताना त्यांनी स्वतःच्या घराणेशाहीकडे बोट दाखवायला हवे. अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे त्यांनी जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारीवर दोन वेळा खासदार झाले," अशी आठवणही मुख्यमंत्री शिंदेंना करुन दिली आहे. 

अगदी देवेंद्र फडणवीसांपासून नारायण राणेंपर्यंत अनेक कुटुंबांचा उल्लेख करत घराणेशाहीवरुन निशाणा साधण्यात आला आहे. "गंगाधर फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही तरी खास नाते असावे असे सांगतात. जय शहा हे महान क्रिकेटपटू अमित शहांचे कोणी तरी लागतात. कोणी म्हणतात रमाकांत आचरेकर, डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स वगैरेंनी क्रिकेटचे धडे चिरंजीव जय शहांकडूनच घेतले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या उद्धाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पीयूष गोयल व वेदप्रकाश गोयल यांचेही काही तरी संबंध असल्याचा संशय आहे. नारोबा तातू राणे व नित्या नारू राणेही एकाच घरात राहतात. महाराष्ट्रात विखेपाटील, मुंडे परिवार, लातुरात निलंगेकर अशा अनेक घराण्यांची भाजपातील नाती-गोती तपासावी लागतील," अशी खोचक टीका करण्यात आली आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, वारसा प्रकाश आंबेडकर पुढे नेत आहेत. उद्या आंबेडकरांच्या घराणेशाहीवरही शिंदे आपली जीभ टाळ्यास लावतील. ज्यांच्या घराण्यात विचार आहे, तोच विचारांची घराणेशाही पुढे नेतो. शिंद्यांसारख्यांची घराणी ही दलाली व खोकेबाजीचा वारसा पुढे नेतात. महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे उदयन राजे भाजपच्या घरात आहेत. शिंदे त्यासही घराणेशाहीच म्हणणार काय?" असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे. ते घराणेशाहीवर बोलतात, पण गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून बेताल बडबडतात. त्यांचा उन्माद फार टिकणार नाही. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ‘ट्रायब्युनल’ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल व खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील! ती वेळ दूर नाही. महाराष्ट्र रामशास्त्र्यांचा आहे. छ‘दाम’शास्त्र्यांचा नाही,"  असं लेखाच्या शेवटी म्हटलेलं आहे.

दरम्यान 

 घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. या प्रक्रियेत तरुणांचा जेवढा सहभाग जास्त असले तितकं देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, भारत लोकशाहीची जननी असून यात तरुणांच मोठं योगदान आहे. देशातील तरुण तरुणींनी यापुढेही लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेतून युवा पिढीला केलं. नाशिकमध्ये आयोजित युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.

आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. विधानसभा अध्यक्षांविरोधात दाद मागण्यासाठी ठाकरे गटामध्ये हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते अनिल परब तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. अनिल परब दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करतील. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल काल दिला.. मात्र निकालाची प्रत अद्यापही ठाकरे गटाला मिळालेली नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com