Top Post Ad

देशातील व्यक्ती जागतिक श्रीमंतीत अव्वल... देश मात्र कर्जबाजारी  भारत देश हा शोषण करणाऱ्या जाती धर्माचा आणि शोषण करू देणाऱ्या जाती धर्माचा देश आहे म्हणून ते दोघेही एकत्र राहून आपली उपजीविका चालवून जगतात. विशेष भांडवलदार आणि कामगार एकाच पक्षात, संघटनेत राहू शकतात, एकच मंदिरात पूजा करून देवाला आशीर्वाद मागतात. असा हा जगा वेगळा देश आहे. खरं तर शोषण होत असलेल्या समाजाला हे माहितीच नाही की आमचं शोषण होतंय इतक्या बेमालूमपणे, अगदी योजनाबद्ध पद्धतीने ही शोषणव्यवस्था हजारो वर्षापासून सुरूच आहे. त्याला फक्त धर्माचं गोंडस रुप दिल्या गेलं आहे. त्यामुळे या विरूद्ध बोलायचं तर दूरच राहिलं त्या व्यवस्थेलाच जगण्याची पद्धती म्हणून स्विकारण्यात आली आहे. म्हणूनच एकीकडे अदानी, अंबानीसह काही मोजक्या उद्योगपतींची संपत्ती वाढतेय, तर दुसरीकडे सामान्य माणसाच्या खिशाला दिवसेंदिवस कात्री लागतेय. मागच्या 10 वर्षांमध्ये देशावरचा कर्जाचा बोजा प्रचंड वाढलाय. याचा अर्थ आपल्या डोक्यावरचं कर्जही वाढत चाललंय. देशातील व्यक्ती जागतिक श्रीमंतीत अव्वल नंबरवर आहेत. आणि त्यांचा देश मात्र कर्जबाजारी आहे. हा प्रचंड विरोधाभास फक्त आपल्याच देशात पहायला मिळतो. आज देशातल्या प्रत्येक नागरिकावर १.४० लाख इतकं कर्ज आहे.  मुठभरांना हव्या तितक्या सोयी-सवलती मिळतायत. ज्यांच्या जीवावर हे सरकार निवडून आलं, त्या सर्वसामान्य जनतेचं मात्र कुणाला सोयरसुतक राहिलेलं नाही. 

प्रति वर्षी दोन कोटी नोकर्‍या,  पेट्रोल ३५ रुपये प्रति लिटर, काळा पैसा परत आणणे, प्रस्थापित भांडवलदारांना बळ दिले, न्यायव्यवस्थेला बाधा आणली, मीडियाला हायजॅक केले, बिघडलेला जागतिक भूक निर्देशांक, गरीबी निर्देशांक, बिघडलेला जागतिक शांतता निर्देशांक, गुन्हेगार, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्याने भरलेले राजकारण, संपत्ती काही लोकांच्या हातात केंद्रित केली, अनियोजित नोटबंदी नंतरचा गोंधळ आणि जीवितहानी, अनियोजित लॉकडाऊन, गोंधळ आणि मजूर, कामगारांची वाताहत, द्वेषयुक्त भाषणांमध्ये वाढ, लिंचिंग, दंगल, महिला कुस्तीपटूंचा अपमान, शेतकरी आंदोलनाला देशद्रोही ठरवले, या सर्व बाबींमध्ये सर्वसामान्यांना  गुंतवून दुसरीकडे सरकारी कंपन्यांची कवडी मोलात विक्री करण्यात आली. त्यामुळे करोडो सरकारी नोकऱ्या संपल्या, बेरोजगारी वाढली, आरक्षण संपले. जुनी पेन्शन बंद झाली, कंपन्यांच्या विक्रीमुळे शासकीय उत्पन्नात घट परिणामी जीएसटीचे रेट वाढले. जीएसटीचे दर वाढवल्यानंतरही शासनाचे उत्पन्न घटले व आजवर मिळणारे म्युच्युअल फंड, एफडी अशा अनेक कर सवलती बंद करून इन्कम टॅक्स सुरू झाले. अशी अराजकता देशात निर्माण झाली आहे. 

एप्रिल 2022 मध्ये वर्ग चार च्या सर्व सरकारी नोकऱ्या 100% संपल्या. मार्च 2023 मध्ये वर्ग 3 व वर्ग 2 च्या सर्व सरकारी नोकऱ्या संपल्या. लेबर/मजदूर कायद्याने दिलेले हक्क अधिकार रद्द करून नवीन  चार  हुकूमशाही विचारांवरील मजदूर कायदे करण्यात आले. लँड इक्वेशन कायदा पारित करून तीन प्लॉटच्या वर घराचे प्लॉट असल्यास सरकार जमा करण्याचा कायदा पारित केला लवकरच लोकांचे प्लॉट व प्रॉपर्टी जप्त होणार. गोल्डच्या संदर्भात कायदा पारित करून 300 ग्राम पेक्षा अधिक असलेले संपूर्ण सोने सरकार जमा होणार. बँकेच्या संदर्भातील कायदा पारित करून पाच लाखावरील पैशाची सेक्युरिटी संपली, बँक बुडाल्यास पैसे परत मिळणार नाही. सर्व बँका अडाणी सारख्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून आज बुडीत निघत आहेत.स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यास व ए.टी.एम मधून विड्रॉल करण्यावर दीडशे ते दोनशे रुपये प्रमाणे प्रति ट्रांजेक्शन चार्जेस लावून बंधने लादण्यात आले. शैक्षणिक धोरण 2020 पारित करून सर्व शिक्षण खाजगीकरण झाले त्यामुळे सर्वसामान्यांना आता शिक्षण दुरापास्त होणार. एवढं सगळं होऊनही सर्वसामान्य जनता मात्र हे डोळे बंद करून पहात आहे. ती केवळ लवकरच होणाऱ्या राममंदिर निर्माणाच्या विजयघोषात दंग आहे. एवढे रामाला आपलंस करून देखील त्याच्या मंदिरातल्या गाभाऱ्यात या ८५ टक्के बहुजनांना प्रवेशच नाही. तरीही सारं कसं शांत. 

ब्रिटिशांनी  ब्राह्मणांचा विरोध मोडून काढत शिक्षण, आरोग्य, आणि स्वरक्षण करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना दिला. त्यात महार समाजाचे लोक सर्वात पुढे आले त्यांनी आपला कौशल्य, शौर्य दाखवुन दिले होते. त्यामुळे ब्रिटिशानी लढाईत सर्वात पुढे त्यांना ठेवले. त्यांनीच ब्रिटिशाहाच्या बाजुने संघर्ष करून धर्मसत्तेचा माज असलेली पेशवाई गाडली. त्या लढाईला दोनशे दोनशे वर्ष पूर्ण होतांना नेमकी राज्यात व केंद्रात पेशवा विचारांच्या वारसदारांची सत्ता होती. आणि त्यांनी काय काय केले हे साऱ्या जगाने पाहिले. आजही एल्गार परिषदेच्या निमित्ताने अनेकजणांचा तुरुंगवास सुरुच आहे.     

८५ टक्के बहुजन समाजसाठी, कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास आहे. तेच मनुवादी मानसिकता असणाऱ्या पेशव्यांच्या रक्ताच्या वारसदारांना मान्य नाही. तो पुसून काढण्याचा प्रयत्न सातत्याने होतच आहे. त्यासाठी बहुजन समाजातील तरुणांना वैचारिक मानसिक दुष्ट्या आंधळे बनवुन त्यांच्यातली संघर्षशक्ती संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न सातत्याने होतच आहे.  पेशवाईत भारतातील ८५ टक्के बहुजन समाजाला अन्याय, अत्याचार सहन करावा लागत होता.  धार्मिक, सांस्कृतिक  रितीरिवाजाच्या नांवाखाली भयानक अन्याय अत्याचार करून मानसिक गुलामी लादण्यात येत होती.  तरीही इथला ८५ टक्के बहुजन समाज त्या विरोधात पेटून उठत नव्हता. मात्र त्यातील महार समाजानेच हा धार्मिक अत्याचार फेकून दिला आणि आपले अस्तित्व सिद्ध केले.  त्यांच्या या संघर्षाची नोंद कायमस्वरूपी इतिहासात नोंदल्या गेली आहे. आज सातत्याने ती पुसण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होत आहे. हा भीमा-कोरेगावचा रणसंग्राम हे शल्य त्यांना दिवसेदिवस अधिक टोचत आहे. २०१८ ला राज्यात व केंद्रात पेशव्यांच्या विचारांचे सरकार होते. त्यांच्या मनात दोनशे वर्षाची सल कायम होती.  पद, पैसाची अमिषे देऊन बहुजन वर्गातील दलालांच्या मदतीने लोकशाही मार्गाने पेशवाईने पुन्हा सत्ता हाती घेतली होती. नीती तीच होती, छल, कपट, कट कारस्थान, खोटे बोल पण रेटून बोल.  पांच हजार वर्षापूर्वी आमची धर्मसत्ता होती हे मोहन भागवत म्हणुनच गर्वाने सांगतात. पण धर्माची होती की अधर्माची हे ते सांगत नाही. आजही सत्तेच्या जोरावर इथल्या ८५ टक्के बहुजन वर्गाला गुलामीच्या जोखडात पुन्हा एकदा बांधण्याचे कारस्थान बेमालूमपणे सुरू आहे. त्याला बहुतांशपणे बहुजनातले दलालच कारणीभूत आहेत. आज विरोधकांना चितपट करणारी पेशवाई उद्या या दलालांनाही आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हेही तितकंच खरं आहे. म्हणूनच आज जागो बहुजन जागो... देश हमारा है... हमें ही उसकी रक्षा करनी है... वो तो झोला उठाकें चले जाएंगे... पुन्हा एकदा त्या भीमा कोरेगावचा इतिहास स्मरून येणाऱ्या नवीन वर्षात तितक्याच ताकदीने भारताच्या संरक्षणासाठी, ८५ टक्के बहुजनांच्या हितासाठी सिद्ध होणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण ८५ टक्के बहुजन समाज हे शौर्य अंगिकारून ही धार्मिक बंधनं जुगारून देईल हीच आशा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करूया ....

----------

खापऱ्या मांग व महार
बाबासाहेब एक गोष्ट नेहमी सांगायचे ती खापऱ्या मांग आणि  महाराची अगदी हावभाव करून सांगायचे. ती गोष्ट अशी आहे . एकदा खेडगावच्या पाटलांच्या दारात गाव मिटिंग भरते आणि मिटिंग चालू असताना अचानक पाटलांच लहान बाळ  खेळत तिथं येतो आणि संडास करतो.  आता मिटिंग मध्ये पाटलाच्या घरातील कोणी येऊन ते संडास उचलावं हे थोडं कमीपणाच आहे असं पाटलांना वाटलं , मग पाटलांनी मान उंच करून इकडे तिकडे बघितलं तर खापऱ्या नावाचे मांग व महार  मागे उकिरड्याजवळ उभा होते. त्यांना पाहताच पाटलांनी हाक मारली, "आर येss  खापऱ्या जरा इकडं ये की " जी मालक, जी मालक करत खापऱ्या पुढं आला, आर खापऱ्या जरा तिकडं बघ, खापऱ्याला पाटलांचा इशारा कळला. खापऱ्याने ते संडास दोन्ही हातानी उचललं आणि जवळच असलेल्या  गारीत नेवून टाकलं.
मिटिंग सम्पल्यावर ते दोघे  आपल्या गल्लीत आले आणि ते एकदम ताठात चालत होते, जेष्ठ माणसे हाक मारत होती पण ते एकदम छाती फुगवून चालत होते,त्यांचे कोणाकडे ही लक्ष नव्हते . एका वयस्क म्हाताऱ्या बाबांनी त्यांना विचारलं आर आज काय झालं कुणाशी बोलनास?, तुमच्याच तोऱ्यात हाईस.?. ते म्हणाले काय नाही, काय नाही. म्हातारं बाबा म्हणाले आर सांग तरी.! 
ते ताठ आवाजात म्हणाले "ये आज पाटलांनी मला काम सांगितलं.".... मित्र हो इथे कथा सम्पते ... पण आज सुद्धा आपल्या समाजात उच्च जातीच्या  व्यक्तीने काम सांगितल्यावर, किंवा खांद्यावर हात टाकल्यावर आपल्या लोकांना अभिमान वाटतो... 
मग आपले लाचार लोक  त्यांच्या घरातील जमखाना किंवा मिटिंग मध्ये घोंगडे उचलतात....... 
खापऱ्याने पाटलाच्या पोराचा "गु" उचलला काय आणि आत्ताच्या काळात "जमखाना" उचलला काय दोन्हीचा अर्थ एकच समजावा..
धन्य.. ते बाबासाहेब असा महामानव होणे नाही ... लोकांना जागृत करण्यासाठी अशी अनेक  मूर्तिमंत उदाहरणे आपल्या भाषणातून  द्यायचे.... 
तात्पर्य जो डॉ बाबासाहेब यांच्या मार्गाने जाईल त्याच्या आणि त्याच्या पुढच्या अनेक पिढीचा उद्धार होईल...
नाहीतर.. मग खापरे गिरी आहेच पिढ्यानंपिढ्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com