Top Post Ad

आमदारांची नाराजी.... मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी

 


 महाआघाडी सरकारला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेचं गणित मांडलं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार सत्तेत सहभागी झाले. विशेषकरून ज्यांच्यावर इ.डी.ची टांगती तलवार होती, असे सर्व आमदार मागील वर्षापासून सत्तेची फळे चाखत आहेत. मात्र हे आमदार-खासदार अजूनही ईडीच्या रडारवरच आहेत. भाजपशी घरोबा केल्यानंतर सत्तेत गेल्याने चौकशी थांबली. मात्र, गुन्हे अजूनही कायम आहेत. शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्तेत जाऊन वर्षाहून अधिक काळ गेला. मात्र, या नेत्यांवरील गुन्हे अजूनही कायम असल्यामुळे भविष्यात या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा मंत्रालयात रंगली असतानाच आता शिंदे गटातील काही आमदार  त्यांच्या गटाच्या मंत्र्यांविरोधातच नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. काही आमदारांनी आपली कामं होत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  मंत्र्यांना वारंवार सांगूनही कामं होत नसल्याचा सूर अनेक आमदारांनी लावला.  आता या आमदारांची मर्जी आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा अॅक्शन मोडवर येणार का? की मुख्यमंत्री मंत्र्यांना पाठिशी घालणार अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराजी ही अनेकदा समोर आली आहे. मात्र पहिल्यांदाच शिंदे गटातील   15 ते 20 आमदारांनी दोन  ते तीन मंत्र्यांची तक्रार केली आहे. आमदारांनी सहा महिन्यांचा लेखाजोखा आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. या अगोदर देखील आमदार नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर आल्या होता. कोणत्या दोन ते तीन मंत्र्यांवर आमदार नाराज आहेत त्या आमदारांची नावे समोर आलेली नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांची नाराजी परवडणारी नाही. आमदारांना निवडणुकांना सामोरे जायचे आहे. निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी आमदारांची कामे होणे गरजेचे आहे. जर मंत्री आमदाराची कामे करणार नसतील तर मंत्री बदला अशी मागणी आमदारांची आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेताहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   हिवाळी अधिवेशन  संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात काही मंत्र्याची खाती आणि मंत्री बदलण्याची शक्यता आहे टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com