वर्तक नगर येथील श्रीसाईनाथ सेवा समिती मंडळाच्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बळीराम नईबागकर यांनी 1986 साली वर्तकनगर येथे साईबाबा मंदिराची स्थापना केली, श्रीसाईनाथ सेवा समिती आणि सर्व भक्त गेली 37 वर्ष मोठ्या भक्तीभावाने साईबाबांचा वर्धापन दिन साजरा करत आले आहेत, या वेळी भक्तांच्या मागणी वरून साईबाबांच्या चांदीच्या सिंहासनास सोन्याचा मुलामा देण्याचे काम संस्थेने देणगीदारांच्या सहकार्याने सुरु केले आहे, श्रीसाईबाबांचे सिंहासन व गाभरा सुशोभीत व सुवर्णमय करून वर्धापनदिनी उत्सवाची सुरुवात करण्यात येणार आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात साईबाबांसाठी सुमारे 1 कोटीचे आसन बनविण्यात आले आहे, यासाठी अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले योगदान दिले आहे, या सुवर्ण सिंहासनची स्थापना व भक्तांर्पण सोहळ्याचे उदघाट्न संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक आणि संस्थेचे सल्लल्लागार आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,
ठाणेकरांसाठी प्रतिशिर्डी म्हणून ख्याती असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा यंदा ३७ वा वर्धापन दिन आहे. मंदिराच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीसाई सेवा समिती तर्फे तीन दिवस, ५ डिसेम्बर ते ७ डिसेम्बर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सुमारे एक लाख भाविक दर्शन तसेच कार्यक्रमाचा लाभ घेतील तसेच यावेळी सुवर्ण सिंहासनाची स्थापना विधिवत करण्यात येईल अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक बळीराम नईबागकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
नईबागाकर पुढे म्हणाले, दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लाखो भाविकांची गर्दी होत असते, हा सोहळा म्हणजे ठाण्याचा उत्सव बनून गेला आहे,, गेल्या चार दशकात या ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले आहेत, आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य या ट्रस्टने केले आहे.तसेच या उत्सवाला असंख्य साई भक्त ठाणे शहरातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साईंच्या दर्शनासाठी येत असतात त्या भक्तांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध यज्ञ, भजन, महिलांसाठी विविध कार्यक्रम अशा कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
वर्तकनगर येथे १९८६ साली बळीराम नईबागकार व त्यांचे काही सहकारी यांनी मिळून या मंदिराची स्थापना केली होती. ३ बाय ३ च्या छोट्या जागेतून सुरवात ते आताचे विशाल मंदिर हा प्रवास संस्थापक बळीराम नईबागकार यांच्या मेहनतीचे व श्रद्धेचे प्रतीक आहे. साईभक्तांच्या मागणी वरुन श्रीसाईबाबांचे चांदीच्या सिंहासनास सोन्याचा मुलामा देण्याचे काम संस्थेने देणगी दारांच्या सहका-याने सुरु केले आहे. श्रीसाईबाबांचे सिहांसन व श्रीसाईबाबांचा गाभारा सुशोभीत व सुवर्णमय करुन वर्धापनदिन उत्सवाची सुरुवात करण्यात येईल. असेही नईबागकर यांनी सांगितले.
या सुवर्ण सिंहासन स्थापना व भक्तार्पण भक्तार्पण सोहळ्याचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकार (मा. नगरसेलक) आणि संस्थेचे सल्लागार संजय केळकर, आमदार, ठाणे शहर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे लाखो भाविकांची गर्दी होत असते. वर्धापन दिन सोहळा हा ठाण्याचा उत्सव बनून गेला आहे. गेल्या चार दशकात या ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले. आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य या ट्रस्टने केले असून वर्षभर उपक्रम राबवले जात असतात. . यावेळी समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकार, विश्वस्त हरी माळी अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या