Top Post Ad

विशाल भालेराव, महेश देवकर यांची राष्ट्रवादी ठाणे उपाध्यक्षपदी नियुक्ती

 


 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात  आले होते. या शिबिरास जितेंद्र आव्हाड आवर्जुन उपस्थित होते त्यांच्या उपस्थित अनेक कार्यकर्त्यांना ठाण्यातील  कार्यकारीणीत सहभागी करून घेण्यात आले ज्यामध्ये प्रामुख्याने ठाणे विधानसभा क्षेत्रात   विशाल भालेराव तसेच महेश देवकर  ठाणे शहर जिला उपाध्यक्षपद देण्यात आले. आव्हाडांच्या हस्ते यावेळी त्यांना पत्र देण्यात आले. यावेळी आयोजित शिबिरात सुमारे पाचशेपेक्षा अधिक जणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. सुमारे 16 महिलांनी कर्करोग तपासणी करून घेतली. तर सुमारे 93 जणांनी रक्तदान केले. 

येत्या 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालय, तुळजाभवानी मंदिराजवळ, गणेशवाडी- पांचपाखाडी येथे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.  डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील,महिलाध्यक्षा सुजाताताई घाग,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय  सेलचे अध्यक्ष आसद चाऊस यांनी हे शिबिर आयोजित केले होते. 

 या शिबिरात शेकडो नागरिकांनी  नेत्र तपासणी,  मधुमेह, कॅल्शियम,  मणक्याचे आजार, हृदयरोग तपासणी; रक्तदाब व ईसीजी तपासणी करून घेतली.   या शिबिरात काही आजारांवरील औषधांचे तसेच  279 जणांना चष्म्यांचेही मोफत वाटप करण्यात आले. सुमारे 87 जणांना श्रवण यंत्र वापरण्याची सूचना डाॅक्टरांनी केली असून त्यांना अल्पदरात श्रवणयंत्र वाटप सोमवारी (दि11) करण्यात येणार आहे.तर सुमारे 16 महिलांनी आपली कर्करोग तपासणी करून घेतली. 


दरम्यान,  या शिबिरास डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. तसेच, या शिबिरात स्वतःचीही तपासणी करून घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com