Top Post Ad

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अर्थात SRA योजनेच्या नियमात बदल


   झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अर्थात  SRA योजने अंतर्गत सदनिका प्राप्त झालेल्या सदनिका हस्तातंर शुल्क तसेच सदनिका हस्तांतर करण्याच्या कालावधीबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  सदनिका हस्तांतर करतानाचे शुल्क 50 टक्क्यांनी कमी करण्यासोबत, सदनिका हस्तांतर करण्यासाठी याआधी 1 लाख रुपयांचे शुल्क भराव लागत होते. आता मात्र, फक्त 50 हजार इकतेच शुल्क भरावे लागणार आहे. तसेच सदनिका हस्तांतर करण्यासाठीचा दहा वर्षांचा कालावधी कमी करून  फक्त सात वर्षांचा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

वेळेत प्रकल्पाची माहिती न देणा-या बिल्डरांवर महारेरानं कारवाई केलीय. 388 प्रकल्पांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. प्रकल्पांची माहिती न दिल्यानं महारेरानं हे पाऊल उचलंलंय. यात एमएमआरडीए क्षेत्रातल्या सर्वाधिक म्हणजे 127 प्रकल्पांचा समावेश आहे. त्याखालोखाल पश्चिम महाराष्ट्रातल्या 120 प्रकल्पांवर कारवाई झालीय. बँक खाती गोठवण्यासह प्रकल्पाची जाहिरात, मार्केटिंग, फ्लॅट विक्रीवरही बंदी घालण्यात आलीय. पहिल्या तीन महिन्यात प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती अपलोड करणं बिल्डर्सना बंधनकारक आहे. महारेराने दोन वेळा नोटीसही दिली होती. अखेर नोटिशीलाही न जुमानणा-या 388 बिल्डरांना हा दणका देण्यात आलाय. तसेच मुंबईत झोपड्या बांधून 2-2 घरं घेणाऱ्यांना चाप बसवणारा निर्णय एसआरने घेतला आहे. अतिरिक्त सदनिका ताब्यात घेऊन प्रकल्पग्रस्तांना देणार असल्याची माहिती एसआरएने दिली. .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com