Top Post Ad

ठाण्यात उत्सव महाराष्ट्रीयन लघुद्योजकांचा..!


 सर्वात मोठा MSME expo - बिझनेस जत्रा २०२३  दिनांक १ आणि २ डिसेंबर २०२३ रोजी, टीप टॉप प्लाझा, ठाणे येथे संपन्न होणार आहे. बिझनेस जत्राचे हे तिसरे पर्व असून, या उपक्रमाचे MSME क्षेत्रात आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांमध्ये विशेष स्थान आहे. आर्थिक आणि सामाजिक इको सिस्टीम विकसित करण्यासाठी  लक्षवेध, ॲडमार्क मल्टीवेंचर, वा कोर्पोरेशन, वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या महाराष्ट्रीयन लघुउद्योजकांच्या मेळाव्यात १२६ पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असुन वेगवेगळ्या इंडस्ट्रिजशी संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. आपल्या अतिशय बिझी शैड्यूलमधून वेळ काढून या जत्रेस अवश्य भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती या उपक्रमाचे सहआयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 बिझनेस जत्रा २०२३ साठी इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड Joy e-bike मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत. ठाणे येथील सर्वात मोठ्या एमएसएमई एक्स्पोमध्ये सहभागी व्हा आणि व्यवसाय वृद्धीच्या अमर्याद संधीचा लाभ घ्या.  बिझनेस जत्रा २०२३ साठी Quik Shef, Urban Ayureved, Voltas Air Conditioners आणि पितांबरी उद्योग समूह यांनीही सहप्रायोजकत्वाच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट आयोजित बिझनेस जत्रा २०२३ मध्ये १२० पेक्षा उद्योगांचे प्रदर्शन स्टॉल, १०,००० पेक्षा अधिक उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.*लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट* आणि *ॲडमार्क मल्टीवेंचर्स*, *वा कोर्पोरेशन*, *वेल्थ मॅजिक* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बिझनेस जत्रा २०२३ मध्ये १२० पेक्षा उद्योगांचे प्रदर्शन स्टॉल आणि १०,००० पेक्षा अधिक उद्योजकांची उपस्थिती असणार असल्याची माहिती संयोजकांनी आज प्रसिद्धी माध्यमांना दिली. 

   केंद्र सरकार, राज्य सरकार , टिसा, कोसिआ आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे ३ रे वर्ष असून दहा हजारहून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक दोन दिवसात भेट देणार आहेत.भारताच्या इको सिस्टीम तसेच, जीडीपीमध्ये लघु उद्योगांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघुउद्योगांना संकलित करणे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्यवेध आणि २० पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनाद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे. या मेळाव्या दरम्यान लघुउद्योजकांना तसेच नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे. महाराष्ट्र शासन, MIDC, MSME, NSIC, ठाणे महानगरपालिका, विविध बँका आणि ५० हून अधिक व्यावसायिक संघटनाचे विशेष सहकार्य *बिझनेस जत्रा २०२३* साठी लाभले आहे.बिझनेस जत्रा २०२३ मध्ये Industry 4.0, ब्रँडींग, महिला उद्योजकता, व्यावसायिक संघ व्यवस्थापन, व्यवसायाचे आर्थिक नियोजन आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना यासंदर्भात चर्चासत्र आणि परिसंवादाच्या माध्यमातून दिग्ग्ज व्यक्तींचे मार्गदर्शन उद्योजकांना लाभणार आहे. दिग्ग्ज व्यक्तींच्या हस्ते नवीन उत्पादने व सेवा यांचे अनावरण करण्यासाठी बिझनेस जत्रा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून यंदाही Lahs Green India Pvt Ltd निर्मित  विशेष सेवेचे - Tow - Go म्हणजेच Treatment Of Waste On The Go. चे अनावरण करण्यात येणार आहे.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने Tow - Go या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमंलबजवणीची सुरुवात होणार आहे. बिझनेस जत्रा २०२३ बद्दली अघिक माहितीकरिता संचालक प्रविण दरेकर 9004668878 यांच्याशी संपर्क साधावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com