Top Post Ad

दिव्यांगासोबत दिवाळी... एक पहाट आपुलकीची


   दिवाळी पहाटसाठी ठाण्याचा राम मारुती रोड तरुणाईने गजबजलेला असतो सर्वत्र उत्साह, जल्लोष, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा महोत्सवात रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला ठाण्यातील दिव्यांगही त्याच उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात आला.  डॉ. राजेश मढवी फाउंडेशन च्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. त्यामध्ये दिव्यांगांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, तसेच त्यांच्यासोबत दिवाळी फराळाचा आस्वाद ही घेण्यात आला. 

भाजप ठाणे उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी आणि माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या वतीने राम मारुती रोड येथे दिव्यांगांची दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिभा मढवी यांनी सुरुवातीला या विद्यार्थ्यांचे औक्षण केले. यावेळी विश्वास गतिमंद केंद्र, जागृती संस्था, स्नेहालय, सेंट जॉन दि बाप्टीस स्कूल, झवेरी ठाणावाला कर्णबधिर शाळा, कमालिनी, होलीक्रॉस, राजहंस फाउंडेशन, श्री माँ स्नेहालय या शाळा आणि संस्थांतील दिव्यांग, कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. रसिकांनी चांगली दाद दिली. एकीकडे दिवाळी पहाटच्या निमित्ताने डीजेच्या कर्णकर्कश आवाजात धांगडधिंगा सुरू असताना दुसरीकडे दिव्यांगांच्या दिवाळी पहाटमध्ये मात्र निरागस सूर ऐकायला मिळाले. मूकबधिर, कर्णबधिर तसेच दिव्यांग मुलांनी दिवाळी पहाटमध्ये उपस्थिती लावून नृत्याचे सादरीकरण केले.

 विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर वर्षभरात ज्या दिव्यांग, कर्णबधिर, मूकबधिर मुलांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून चांगले सादरीकरण केले त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  राष्ट्रीय पुरस्कार विजेती मनाली कुलकर्णी हिच्या 'तिचीच कहाणी 'वेगळी' आणि 'विल पॉवर' या मराठी-इंग्रजी आवृत्तींचे आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

प्रकृती शहा या विद्यार्थिनीने सूर निरागस हो या गाण्यावर सादर केलेल्या अप्रतिम नृत्याला उपस्थितांची दाद मिळाली. दिव्यांग मुलांच्या अंगीही कला दडलेल्या असतात, त्यांच्या या कलांना वाव मिळावा आणि सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही दिवाळी पहाटचा आनंद घेता यावा या उद्देशाने या दिवाळी पहाटचे सहा वर्षे आयोजन करत आहेत. अशी माहिती डॉ. राजेश मढवी आणि प्रतिभा मढवी यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com