Top Post Ad

सेवा केंद्रातील अश्लील व्हिडिओ क्लिपप्रकरणी दोघांना अटक


  भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या  श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र नाशिक येथील एका अधिकाऱ्याच्या अश्लील व्हिडिओ क्लिपप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  गेल्या पाच वर्षात आरोपी महिलेने अनेक वेळा खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. सारिका असे या महिलेचे नाव असून तिचा मुलगा मोहित  याला सुद्धा अटक करण्यात आलीये. महिलेकडून सेवा केंद्रातील काही आक्षेपार्ह क्लिप्स असलेला संगणक, मोबाईल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आली आहेत. न्यायालयात हजर केले असता महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 2014 सालापासून फिर्यादी सारिका या दोघांची ओळख होते. दोघेही एकाच परिसरात राहत होते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यय घेण्यासाठी सदर महिला आध्यात्मिक केंद्रात जात होती. त्यावेळेस महिलेची फिर्यादीसोबत ओळख झाली होती. एकाच परिसरातील असल्याने त्यांची ओळख वाढत गेली. महिलेने वेळोवेळो फिर्यादीकडे पैशांची मागणी केली होती. नकार दिल्याने महिलेने ते अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. मात्र पीडित व्यक्तीने एक कोटी पाच लाख रुपये खंडणी उकळल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या आश्रमाची जबाबदारी सदर महिलेकडे होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com