Top Post Ad

नारायणगाव येथील ऐतिहासिक शासकीय विश्रामगृह " परिवर्तन भूमी "


  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या नारायणगाव येथील ऐतिहासिक शासकीय विश्रामगृह " परिवर्तन भूमी " ला  भीमराव यशवंत आंबेडकर  १२ नोव्हेंबरला भेट देणार

 पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मौजे नारायणगांव येथे दि. २३ व २४ मे १९३१ रोजी पुणे जिल्हा बहिस्कृत परिषदेचे पाहिले अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते. अधिवेशनास जुन्नर,आंबेगाव,खेड,शिरूर,पारनेर, अकोले व संगमनेर या तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यानिमत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नारायणगाव येथील शासकीय विश्रामगृहात वास्तव्य केले होते त्या शासकीय विश्रामगृहाचे " डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक "  व्हावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मुंबई (नारायणगाव) रजि. या संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षापासून करीत आहोत. दि. १२ नोव्हेबर२०२३ रोजी लेण्याद्री जुन्नर येथे  भारतीय बौध्द महासभा पुणे जल्ह्याच्या वतीने महा अधिवेशन संपन्न होणार आहे. अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय डाॅ भीमराव आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या नारायणगाव येथील या ऐतिहासिक विश्रामगृह  
बाबासाहेबाच्या पद स्पर्शाने प्रेरणा स्थान झाले आहे तेथे स्मारक झालेच पाहिजेत म्हणून  डॉ. बाबासाहेबांचे नातू आदरणीय  भीमराव यशवंत आंबेडकर  खास भेट देणार आहोत. 

तेथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक झालेच पाहिजेत म्हणून स्मारक समितीला पांठीबा देऊन शासनाकडून हे काम युद्धपातळीवर व्हावे म्हणून सर्वोतपरी स्मारक समितीला सहकार्य करणार असल्याचे नारायणगाव शासकीय विश्रामगृहाला भेटीचे निमंत्रण स्विकारताना स्मारक समितीला   भीमराव यशवंत आंबेडकर यांनी सांगितल्याची  सविस्तर माहिती कार्यक्रमाचे नियोजन बैठकीत देवून इत्तरही काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दि. ४ नोव्हेबर २०२३ रोजी सायं. ६ वा. डॉ. आंबेडकर भवन, दादर येथे स्मारक समितीच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती.सदर बैठकीस संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भालेराव, श्रीम.जयश्रीताई उपशाम, डॉ एस.एम.वाघमारे, शांतू डोळस, समाजभूषण सो.ना.कांबळे,सुरेश शिशुपाल,किशोर देठे,विनित लवंदे, शैलेंद्र भोजने,चंद्रकांत सोनवणे,गणेश उबाळे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित प्रसिद्धीपत्रकाद्वारे शशिकांत भालेराव यांनी कळविले आहे.

 शशिकांत भालेराव - अध्यक्ष
डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, मुंबई ( नारायणगांव) रजि.
Mo.9870488110

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com