Top Post Ad

ओबीसीनामा... भुकंप -- प्रा. श्रावण देवरे


 अन्याय-अत्याचाराची परिसीमा झाली की, विद्रोह होणारच! हजारो वर्षांपासून ब्राह्मण-पेशव्यांची धार्मिक-सांस्कृतिक गुलामगिरी व जमीनदार-सरंजामदार मराठ्यांची भौतिक-शारिरीक गुंडगिरी सहन करण्याची प्रवृत्ती दलित-ओबीसींच्या रक्तातच भिनली होती. परंतू तात्यासाहेब महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्या दलितांनी सर्वात आधी स्वीकारले ते दलित बर्‍याचप्रमाणात या गुलामगिरीतून मुक्त झालेत. *मात्र ओबीसींना उशिरा का होईना फुले-आंबेडकर कळत आहेत व ते जागृत होत आहेत,* विद्रोहाचा झेंडा उंचावतो आहे! परंतू त्यासाठी ओबीसींना आपल्या आरक्षणाची किंमत चूकवावी लागलेली आहे. विद्रोह दोन प्रकारचे असतात. एक हिंसक व दुसरा अहिंसक! अर्थात हिंसा दोन कामासाठी वापरली जाते. एक- शोषित पिडीतांवर दरारा निर्माण करण्यासाठी शोषक-शासक हिंसा करतात. अशा प्रकारचा हिंसाचार नुकताच बीडमध्ये व तुळशीमध्ये आपण पाहिला.  दोन- अन्याय अत्याचाराचा विरोध करण्यासाठी शोषित-पिडीत हिंसा करतात. अशाप्रकारच्या हिंसेचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे नक्षलवाद!

ओबीसी हा मुळातच शांतता-प्रेमी व कष्टाचे खाणारा असल्याने सहसा तो हिंसेला कधीच प्रवृत्त होत नाही. ओबीसींना मार्गदर्शन करणारा ब्राह्मण असेल तर ओबीसी काही काळासाठी धर्माच्या नावाने हिंसेला प्रवृत्त होतो. मात्र ओबीसींना मार्गदर्शन करणारा फुले-आंबेडकरवादी असेल तर ओबीसी कधीच हिंसेला प्रवृत्त होत नसतो. 1955 सालापासुन 35 वर्षांपर्यंत ओबीसींनी लोकशाही व संवैधानिक मार्गाने संघर्ष करून मंडल आयोगाचे आरक्षण मिळवले. *त्यासाठी सामी पेरियार, कर्पूरी ठाकूर, शहिद जगदेवप्रसाद कुशवाहा, त्यागमुर्ती चंदापूरी, लालू-मुलायम, कर्मवीर जनार्दन पाटील अशा एकूण चार पिढ्यातील हजारो ओबीसी नेत्यांनी लोकशाही मार्गाने संघर्ष करून ओबीसी आरक्षण मिळविले. कधी दगड हातात घेतला नाही व कधी कुणाचे घरही जाळले नाही.*

आज महाराष्ट्रात जो ओबीसींचा उद्रेक दिसतो आहे, तो राज्यात दोन प्रकारचा भुकंप घडविणार आहे. मराठा व ब्राह्मण जातींच्या मालकीचे चार राजकीय पक्ष महाराष्ट्रात आहेत व ते गेल्या 75 वर्षांपासून आलटून-पालटून सत्तेवर येत असतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मराठ्यांच्या मालकीचे पक्ष आहेत. भाजपा-सेना हे ब्राह्मणांच्या मालकीचे पक्ष आहेत. दरम्यानच्या काळात आदिवासी, दलित व मुसलमानांनी आपापले राजकीय पक्ष उभे करण्याचा प्रयत्न केला, परंतू ब्राह्मण-मराठ्यांनी त्यांना छोटी-छोटी आमिषे दाखवुन विकत घेऊन टाकले. *परंतू आता जो ओबीसी विद्रोह उभा राहीलेला आहे, तो सरळ-सरळ दोन भुकंपच घडवून आणणार आहे व प्रस्थापितांच्या पक्षांची सत्ता नष्ट करणार आहे.

पहिला भुकंप
आज प्रत्येक गावात पाड्यात व वस्त्यांवर एकच नारा गुंजतो आहे- *‘‘ओबीसीचे मतदान ओबीसीलाच! मराठ्याला चूकूनही मतदान नाही!’’ हा नारा ब्राह्मण-मराठ्यांच्या घराघरात जाउन दरारा निर्माण करतो आहे.* 2018 साली फडणवीसांनी मराठ्यांना वेगळे 16 टक्के आरक्षण दिले असले तरी ते त्यांना ‘‘ओबीसी’’ म्हणूनच दिले होते. याचा राग 2019 साली ओबीसींनी मतदान पेटीतून व्यक्त केला व भाजपाच्या 25 सीट कमी झाल्यात! आता 2024 साली दोन अंकी तरी सीट येतात की नाही, याची चिंता फडणवीसांना लागलेली आहे. ओबीसींकडून असा काही भुकंप होण्याआधीच स्वतः फडणवीसच पहिला भुकंप ओबीसींसाठी घडवून आणणार आहेत. या पहिल्या भुकंपाची पार्श्वभुमी समजून घ्या!

ओबीसी राजकीय आघाडीचा भुकंप
गेल्या तीन वर्षांपासून मी *‘‘ओबीसी राजकीय आघाडी’’*ची बांधणी सुरू केली आहे. *ओबीसी राजकीय आघाडीचा पहिला उद्देश हा आहे की, ओबीसींची गेलेली प्रतिष्ठा परत मिळविने!* एक काळ असा होता की, खेड्या गावातील कोणत्याही जातीचा ओबीसी कार्यकर्ता तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणी ‘‘मी समता परीषदेचा कार्यकर्ता आहे’’ असे सांगताच समोरचा बसलेला हवालदार ताडकन उठून उभा राहात होता. ‘‘काय काम काढलं, साहेब’’ असे नम्रपणे बोलत चहापाण्याला विचारायचा! आज काय परिस्थिती आहे? जरांगेसारखा मुलगा भुजबळसाहेबांच्या येवल्यात जाऊन सभा घेतो आणी भुजबळांना टोले-टपल्या मारून सहज निघून जातो. *गावरान भाषेत याला ‘‘घरात घूसून आय-माय काढणे’’, असे म्हनतात. काय ईज्जत राहीली ओबीसींची?*

 ओबीसींच्या प्रत्येक बैठकीत मी सांगत असतो की, 2024च्या लोकसभा निवडणूकीत ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना एकून 50 लाखापर्यंत मते पडलीत तर अजित पवार ताबडतोब उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील व आपल्या भुजबळसाहेबांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवतील! त्याही पुढे जाऊन फडणवीस भुजबळांना मुख्यमंत्री करतील. कारण विधानसभेच्या निवडणूका ओबीसी नेत्याच्या नेतृत्वाखाली झाल्या तरच बामन-मराठ्यांचे पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची धुसर आशा करता येईल! ज्यांनी भुजबळसाहेबांना जेलमध्ये टाकून ओबीसींचा अपमान केला तेच फडणवीस-पवार भुजबळांना स्वतःहून मुख्यमंत्री करतील! *अशा प्रकारे आपला ओबीसी नेता सन्मानपूर्वक मुख्यमंत्री झाला तर गेलेली ईज्जत परत येईल!*

महाराष्ट्रभरातील हा आमच्या बैठकांचा वृतांत फडनवीसांच्या कानावर गेलेला असल्याने आता त्यांनी भुजबळसाहेबांना बळ देणे सुरू केले आहे. ओबीसी राजकीय आघाडीतर्फे लोकसभा निवडणूकीत भुकंप होण्याआधीच आपण स्वतः आत्ताच भुकंप घडवून आणला तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जिंकता येतील, असा कयास फडणवीसांचा आहे. *31 डिसेंबरला शिंदेशाही खतम झाल्यावर भुजबळ मुख्यमंत्री होतील व त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणूका लढवून जिंकण्याचा मनसुबा फडनवीस-अजित पवार रचित आहेत!*

आता हा मनसुबा यशस्वी होण्यासाठी फडणवीसकृत पहिला भुकंप किती रिस्टर स्केलचा असेल व ओबीसी राजकीय आघाडी तर्फे होणारा दुसरा भुकंप काय हडकंप माजविनार आहे, हे आपण ओबीसीनामा-8 मधील उत्तरार्धात पाहू या!   

 तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!               


  • -प्रा. श्रावण देवरे                                    
  • संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी,
  • संपर्कः* 94 227 88 546 *ईमेलः* obcparty@gmail.com 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com