आदरणीय शरदचंद्र पवार यांचे बारामती मधील गोविंद बाग हे निवासस्थान दिवाळी निमित्त व भाऊभिज निमित्ताने मान नाम अजित दादा पवार यांचं काटेवाडीतील फार्म हाऊस प्रसारमाध्यमांनी चर्चेचा विषय केला होता. मान नाम अजित दादा पवार उपमुख्यमंत्री गोविंद बागेत येणार का? हा अवघ्या प्रसारमाध्यमांनी अवचित्याचा मुद्दा उपस्थित करत होते आणि दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर रात्री सहभोजनाला मान नाम. अजित दादा आले आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तो फोटो प्रसारित पण केला, या अगोदरही मान नाम अजित दादा पवार यांच्या वडिलांच्या नावानं असलेल्या शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त आदरणीय शरदचंद्र पवार आणि मान नाम. अजित पवार एकत्र आले आणि शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा पुण्यातील काही कार्यक्रमांना ते एकत्र येणार अशी चर्चा प्रसारमाध्यमे फार गोडीन करत असतात.
मराठीमध्ये एक म्हण आहे 'खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' कोणी बोललं होत ना, की 'खायचे दात व दाखवायचे सुळे' . तरी एकूणच मान नाम.अजित दादा पवार यांनी घेतलेली भूमिका त्यासंदर्भात आदरणीय शरदचंद्र पवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूणच महाराष्ट्रामध्ये लावलेला कार्यक्रमांचा व भेटीगाठींचा धडाका, मान नाम अजित दादा पवार आणि त्यांच्या सोबत आलेली टीम त्यांनी त्याच दिलेले प्रत्युत्तर हे सगळं पाहिल्यानंतर सामान्य जनता म्हणून असं वाटतंय की, पूर्वी ह्यांनी केलेली फसवणूक लोकांना कळत नव्हती तर आता ह्यांची नाटक आणि फसवणूक लोकांना कळू लागलेली आहे आणि निश्चितपणाने जनता याला धडा शिकवल्याशिवाय किंवा खरं खोटं केल्याशिवाय राहणार नाही, असं वाटतं.
दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आदरणीय शरदचंद्र पवार आणि मान नाम.अजितदादा पवार ज्या काटेवाडी गावचे सुपुत्र आहेत त्या गावची ग्रामपंचायत निवडणूक झाली तिथे मात्र मान नाम.अजित पवारांचं पॅनल निवडून येतं, आदरणीय शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी त्या ठराविक काही ग्रामपंचायती बारामती तालुक्यातील निवडणुका लढवायच्या नाही, काटेवाडीची निवडणूक लढवत नाही. आता बारामती विधानसभा आणि लोकसभेला कोणाच्या विरोधात कोण उभे राहते त्यातून जनतेला नेमकं खरं, यांचं काय चाललंय हे कळेल. कदाचित कौशल्याने सुप्रिया ताईंना लोकसभेत आणि अजित दादांना विधानसभेत पाठवण्यासाठी फसवणुकीच्या नव्याने भावनिक आखाडे गोविंद बाग व काटेवाडीत आखले जात असतील दिपावलीच्या नाहीतर हारलं तरी आणि जिंकलं तरी आपल्याच घरातलं माणूस लोकसभेत आणि विधानसभेत जाईल का नाही याच्यासाठीची रणनिती करत असतील, अशा पद्धतीच्या वरवर सार्वजनिक आणि आतून कौटुंबिक असणाऱ्या कार्यक्रमांमधून दिसून येते. दीपावलीच्या सणासुदीला पवार कुटुंब एकत्र आहेत,ही चांगली गोष्ट आहे,
मात्र काका पुतण्यांनी महाराष्ट्रातली जी जी घर आणि कुटुंब फोडली आहेत, ते दिवाळीनिमित्त एकत्र आहेत का नाहीत, हे ही तपासणे आवश्यक आहे. तसेच काका पुतण्याच्या फुटीवर आपली भूमिका मांडणारे व विरोधात आणि टोकाची भूमिका घेणारे तेच राजकीय प्रतिनिधि मीडियासमोर येणारे नेते ते कौटुंबिक कार्यक्रमात पवार कुटुंब कसे एकत्र आले ते ही हेच कौतुकाने सांगत आहेत, त्यामुळे आपण अगोदर काय बोललो होतो आता काय बोलत आहोत याचं तरी त्यांना भान आहे का? हे पण तपासले पाहिजे.
सदर अनुषंगाने सुज्ञान नागरिकांनी आणि राजकीय क्षेत्रातील धुरीनांनी अशा पद्धतीच्या राजकीय सत्तांतराच्या संदर्भामध्ये चौकसपणाने विचार करून ज्या समुदायाचे आपण प्रतिनिधित्व करतो, त्या समुदायाला आपण कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, या फसवणूक करणाऱ्या प्रवाहामध्ये आपणही स्वतःला फसवून घेत आहोत का? याची खातरजमा करून घेतली पाहिजे आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने गोविंद बाग व काटेवाडी मध्ये वेगवेगळ्या प्रसारमाध्यमे आणि सार्वजनिक जीवनामध्ये फटाके फोडणाऱ्यांनी नेमके येणाऱ्या कालखंडामध्ये कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात फसवणाऱ्या लोकांच्या का दिशा देणाऱ्या लोकांच्या बाजूने फटाके फोडायचे हे सुज्ञ मतदार आणि राजकीय धुरीणांनी ठरवायला हवं. असंच गोविंद बाग व काटेवाडीच्या निमित्ताने मला वाटते.
प्रवीण मोरे ... रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता
खारघर, नवी मुंबई
0 टिप्पण्या