Top Post Ad

शिवराळ भाषा, अटक, शिवसैनिक आक्रमक


 शिवसैनिक म्हणजे आक्रमता आणि शिवराळ भाषा,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक कडवट शिवसैनिक तयार केले. त्यामध्ये दत्ता दळवी यांचे नाव पहिल्या यादीत येतं. भांडुपमध्ये रविवारी शिवसेनेचा ठाकरे गटाच्या कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर पोलिसांनी  गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.  त्यांना कोर्टात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे.

 चौकशीकरता बोलवत त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. १२ डिसेंबरपर्यंत ठाण्यातील कारागृहात ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या अटकेवर न्यायालयाकडून उद्यापर्यंत स्थगिती नाही मिळाली तर इशान्य मुंबईत चक्काजाम करणार.  ईशान्य मुंबईतील एलबीएस रोड, हायवे, सर्व पोलीस ठाणे या ठिकाणी दुपारी १२ वाजता जाम करून टाकू. दत्ता दळवी बाहेर येणार नाहीत तोवर रस्त्यावरील आंदोलन सुरू ठेवू”, असा  इशाराही सुनील राऊत यांनी दिला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सकाळी १०-१२ पोलीस मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या घरी गेले आणि एका ३०२, ३०७ (हत्येप्रकरणी लावण्यात येणारी कलमे) चा ज्याप्रमाणे कैदी असतो त्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या वकिलांनी याविरोधात लढा देऊन न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली. साडेअकरा वाजता न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर दोन तासांत यावर स्थगिती यायला हवी होती. परंतु, स्थगिती अद्यापही आलेली नाही. स्थगिती देण्यासाठी चालढकल सुरू आहे.

या आधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जाहीरपणे टीका केली होती. आता दत्ता दळवींनी शिवराळ भाषेत वक्तव्य करत थेट मुख्यमंत्र्यांनाच अंगावर घेतलं आहे. पण त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही शिंदे गटाला फायदेशीर ठरणार की ठाकरे गटाच्या जुन्या शिवसैनिकांमधील आक्रमकता पुन्हा पहायला मिळणार हे लवकरच दिसून येईल. सत्तेच्या मोहाला बळी पडून खरा शिवसैनिक आपली आक्रमकता गमावून बसला आहे की पुन्हा नव्याने उभा राहणार अशी चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. कारण दत्ता दळवींच्या अटकेनंतर आता  शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. 

 शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातही ‘गद्दार हृदयसम्राट’ असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी खालच्या भाषेतील टीका किती काळ सहन करणार असा प्रश्न शिंदेंना विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “मी माझं काम करतो. आम्ही सरकार म्हणून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करतो. ते बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती विसरले आहेत. ते बाळासाहेबांचे शिकवण विसरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आरोप करणं, खालच्या पातळीवरील भाषा वापरणं हा त्यांचा एककल्ली कार्यक्रम आहे. ते आमच्या संस्कृतीत नाही.”

या प्रकरणामुळे दत्ता दळवी पुन्हा नव्याने चर्चेत आले आहेत. मुंबईचे माजी महापौरच नाही. तर बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर आणि कडवट शिवसैनिक, धाडसी आणि आक्रमक शिवसैनिक ही त्यांची पहिली ओळख.  दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच 2005 ते 2007 या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. सन 2018 साली दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात सत्तेच्या राजकारणात शिवसेनेची वाताहत झाली. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची निष्ठा कायम ठेवली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com