महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड हे असणार आहेत. वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरुन हटवले आहे. मोपलवार हे राज्यात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोपलवार यांना पदावरुन हटवले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी मंडळाच्या प्रमुखपदाची सूत्रे आता राधेश्याम मोपलवार यांच्याकडून अनिल गायकवाड यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे मुख्यंमंत्रीपदाच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते. मंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी 2018 मधील निवृत्ती नंतरही रेकॉर्ड ब्रेक सात वेळा आपली कालमर्यादा वाढवून घेतली होती.
त्यांच्या आठव्या नियुक्तीचाही कालावधी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी संपला होता. महाराष्ट्र सरकारने एखाद्या अधिकाऱ्यावर मेहेरबान होण्याचा हा सर्वोच्च विक्रम ठरला असून मोपलवार यांची ' छुटी' कधी करणार,असा सवाल मंत्रालयात सध्या विचारला जात होता. एकाच सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याची प्रदीर्घ काळ रस्ते विकास महामंडळात 'प्रतिष्ठापना' करण्यातून प्रशासनात चुकीचा आणि घातक पायंडा पडत होता. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळातील अनेक सक्षम आणि कर्तबगार अधिकाऱ्यांना संधीपासून वंचित राहावे लागत असल्याने शासनाने अखेर मोपलवार यांची गच्छंति केली आहे. आणि त्यांच्या जागी अनिलकुमार गायकवाड एमएसआरडीसीचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले आहेत.
मुंबईतील अनेक उड्डाणपूले, मुंबई फोर्ट येथील सार्वजनिक बांधकाम भवन, नवी दिल्लीतील दिमाखदार असे महाराष्ट्र सदन, आगीनंतर मंत्रालयाचे करण्यात आलेले आकर्षक मेकओव्हर, मोखाडा येथील वैतरणा प्रकल्पात २७६ फूटावर बांधलेला आव्हानात्मक पूल असे अनेक प्रकल्प अनिलकुमार गायकवाड यांच्या कल्पकतेतून साकारले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक रोड , बांद्रा-वर्सोवा सी लिंक रोड, कोस्टल रोड अशा महत्त्वाच्या प्रकल्पानी आकार घेतला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या प्रकल्पांची जबाबदारीसुद्धा रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासोबत अनिलकुमार गायकवाड यांच्या खांद्यावर होतीच.
मात्र आता ती संपुर्णपणे गायकवाड यांच्याकडे आली आहे. त्याचबरोबर लवकरच सुरू होणारा पुण्यातील हजारो कोटींचा रिंग रोड हा प्रकल्पही गायकवाड यांच्याच अभियांत्रिकी प्रतिभेचेच अपत्य आहे. या प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया आता पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे रिंग रोडचा प्रकल्पही त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू होऊन यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल, राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) येथे व्यवस्थापकीय सहसंचालक असलेले अनिलकुमार गायकवाड यांचा प्रशंसनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारने ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार देऊन दोनदा राज्यपालांच्या हस्ते गौरव केलेला आहे. तर, स्थापत्यकला क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल गायकवाड यांना राजस्थानच्या पिलानी येथील श्रीधर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केलेले आहे
ही अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्याची पोच पावती आहे. मुंबईतील क्लिष्ट उड्डाणपूलं, मुंबईतलं बांधकाम भवन, नवी दिल्लीतलं देखणं, आधुनिक महाराष्ट्र सदन, आगीनंतर मंत्रालयाचं कॉर्पोरेट मेकओव्हर, वैतरणा नदीवरील 276 फूटांवर बांधलेला आव्हानात्मक पूल ही आव्हानात्मक कामं लिलया पूर्ण केली आहेत. सध्या महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख निर्माण केलेल्या बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प, बांद्रा-वर्सोवा सी-लिंक प्रकल्प या प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर असून या प्रकल्पांची तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळण्यासाठी अनिलकुमार गायकवाड पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना यशस्वीरित्या पूर्ण करणारे अनिलकुमार गायकवाड म्हणूनच महाराष्ट्राचा ‘अभियांत्रिकी चेहरा’ ठरतात. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर सोपवलेली ही नवीन जबाबदारी ते निश्चितच लिलया पेलतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते, बहुजन संग्राम,महाराष्ट राज्य.अध्यक्ष भीमराव चिलगावकर.यांनी प्रजासत्ताक जनताशी बोलतांना व्यक्त केला.
0 टिप्पण्या