सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्याला विशेष आमंत्रण देऊन 'वर्षा'वरील गणपती आरतीला बोलावल्याचे उघड झाले आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. वर्षा वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात वर्षावर गुंडांना सहज प्रवेश मिळत असल्याचे यावरून दिसते.
यासंदर्भात अतुल लोंढे पुढे म्हणाले की, विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. नोएडाच्या पोलिसांना एल्वीस यादव रेव्ह पार्त्या आयोजित करतो याचा छडा लागला पण मुंबई अथवा महाराष्ट्र पोलीसांना एल्वीसच्या काळ्या कृत्यांची माहिती नव्हते असे म्हणता येईल का? एल्वीसची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असताना त्याची खबर पोलिसांनी नसावी व मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास्थानी तो मुख्यमंत्र्यांचा पाहुणा म्हणून विशेष सन्मान दिला जातो हे आश्चर्यकारक आहे. एल्वीस यादवला 'वर्षा'वर कोणाच्या सांगण्यावरून विशेष सन्मान मिळाला, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेचे 'वर्षा' बंगल्यावरील फोटो झळकले होते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच गुंडांना विशेष पाहुणा म्हणून मान सन्मान मिळत असेल तर पोलीस विभाग तर काय करणार? पण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा शासकीय 'वर्षा' बंगलाच जर गुंडांना 'अतिथि देवो भव' म्हणत असेल तर 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' असाच प्रश्न पडतो असेही अतुल लोंढे म्हणाले.
एल्विश यादव या युट्यूबरवर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात तक्रारही दाखल झाली आहे. एल्विश आणि त्याच्यासह सात जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा एफआयआर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात घटनास्थळी 9 सापही आढळले होते. हा एफआयआर वन्यजीव संरक्षण कायदा,1972 नुसार दाखल झाला असून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार मेनका गांधी यांच्या पीएफए संस्थेच्या तक्रारीनंतर तो दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये ही संस्था म्हणते, 'आम्हाला एल्विश यादव नावाचा युट्यूबर सापाचं विष आणि जिवंत साप घेऊन आपल्या टोळक्यासह नोएडामध्ये फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी आणि व्हीडिओ शूट करतो. तिथं परदेशी युवतींना बोलावलं जातं त्यांच्यासह सापाचं विष तसेच इतर नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जातं. '
सापाच्या विषामुळे खरंच नशा होऊ शकते का तर त्याचे उत्तर होय असे आहे. नशा करण्यासाठी जगभरात निकोटीन, भांग, अफू यासारख्या पदार्थांचे सेवन केले जाते, तर अनेकजण नशा करण्यासाठी स्मोकिंग, इंजेक्शनचा वापर करतात. मात्र आता त्याही पलिकडे जाऊन सापाचे विष पिण्यासही सुरुवात केली आहे. नुकतेच विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यामुळे सध्या सापाचे विष हे खरेच अंमली पदार्थांच्या व्यसनाचे बळी बनवू शकते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सध्या हेरॉइन आणि ओपिओइड्सपेक्षा जास्त नशा मिळवण्याची आकांक्षा बाळगणारे लोक आता साप आणि विंचूच्या विषाकडे वळले आहेत हे ही तितकेच खरे. सापाच्या विषाची नशा वेगळ्या प्रकारची असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे नशेत सापाचे विष सेवन करण्याचा कल वाढत आहे.
खरे तर नशा करण्यासाठी सापाचे विष वापरणे अत्यंत धोकादायक आहे, कारण विष हे विषच असते. हे सुरक्षित मनोरंजक औषध नाही, कारण साप त्यांचा शिकार पक्षाघात करण्यासाठी आणि मारण्यासाठी करतात. याव्यतिरिक्त, सापाच्या विषाचे सेवन करण्यापासून जास्त प्रमाणात किंवा मृत्यू टाळण्यासाठी कोणताही मार्ग नाही, कारण एका वेळी प्रशासित केलेल्या विषाचे प्रमाण एखाद्या व्यक्तीने थेट सापाच्या चाव्याव्दारे विष खाल्ल्यापेक्षा जास्त असेल. अंदाज करणे खूप कठीण आहे. सापाच्या विषामध्ये आढळणाऱ्या न्यूरोटॉक्सिसिटीमुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला, तरी त्यामुळे मृत्यू आणि अर्धांगवायूचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.
ड्रग्स,सेक्स याने लबालब असणाऱ्या पार्ट्या आयोजित करणारा एल्विश यादव हा व्यक्ती ज्याचे थेट संबंध ज्या महिलेच्या खांद्यावर देशाची शिक्षण व्यवस्था अवलंबून आहे, जी महिला देशाचे शैक्षणिक धोरण ठरवते त्या महिलेसोबत आहेत..खरतर या महिलेची मुलगी गोव्यात लुटलेला रेस्ट्रो अँड बार चालवते अनेक पार्ट्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट करते...
आता कळतय अदानीच्या मुद्रा पोर्टवरील ड्रग्स कोणासाठी येते ते...
ये पब्लिक हैं जो धर्म के नामपर क्यूतिया बनती है..
वो कुच्छ जानती नही...
ब्रिज कोसळले तरी भ्रष्टाचार नाही..
ड्रग्स सापडले तरीही देशभक्त...
0 टिप्पण्या