Top Post Ad

हरवत चाललेल्या माणुसकीचे बळी !

 


   २८ मे  २०२३ ला दिल्लीच्या शहाबाद डेअरी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. साक्षी नावाच्या एका १६ वर्षीय मुलीची साहिल नामक तरुणाने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. रहदारीच्या परिसरात ही घटना घडत असताना बाजूने अनेक जण ये-जा करत होते मात्र त्यापैकी कोणीच साक्षीच्या मदतीला धावून आला नाही. यावेळी जेवढी चर्चा या हत्याकांडाची झाली तेव्हढीच चर्चा माणसातील हरवत चाललेल्या माणुसकीची झाली. साक्षी मदतीसाठी जिवाच्या आकांताने विव्हळत होती; मात्र बाजूने जाणारे लोक तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे करत पुढे जात होते, हे साऱ्या देशाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहिले. त्यापैकी २-४ जण जरी साक्षीच्या मदतीला धावून गेले असते, तरी साक्षी आज जिवंत असती. 

मात्र 'ती दुसऱ्याची मुलगी', 'माझी कोणीच नाही', 'मी का तिच्या मदतीला जाऊ', 'इतरही आजूबाजूला लोक आहेत ते जात नाहीत, तर मी का जाऊ ?' 'मी पुढे गेलोच तर उद्या पोलीस मला त्रास देतील, कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील त्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.' या वैचारिक वादळातून त्यावेळी आजूबाजूने जाणारे अनेक जण गेले असतील, पण त्यांच्या या विचारांच्या रणकंदनावर त्यांच्यातील विवेकाला मात करताच आली नाही. साक्षीच्या जागी माझी मुलगी, माझी बहीण असती, तरी मी असाच दुर्लक्ष करून पुढे गेलो असतो का, असा विचार त्यावेळी कोणाच्याच मनाला शिवला नाही परिणामी भर रस्त्यात साक्षीचा नाहक खून झाला या खुनाला हे बघेही जबाबदार आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार. आज ५ महिन्यानंतर साक्षी हत्याकांडाची पुन्हा एकदा आठवण जागी झाली. कारण दिल्लीतील मृतवत समाजाचा अनुभव पुन्हा एका निष्पाप तरुणाला आला. मानवातील मेलेल्या माणुसकीने पुन्हा एकाचा बळी  घेतला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com