Top Post Ad

सरकारचे जनविरोधी धोरण... रिपब्लिकन पक्षाचे जनजागृती अभियान


  केंद्र, आणी महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय हे अत्यंत घातक असून सामान्य माणसाला उध्वस्त करणारे आहेत, नव्हे तर देशच उध्वस्त करण्याचे सरकारचे धोरण / निर्णय आहेत, नुकताच महाराष्ट्र शासनाने 62 हजार सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, भविष्यात गोरगरीब, सामान्य नागरिकांच्या मुलांना शाळेत शिक्षण घेणं अत्यंत अवघड होणार आहे, सदर निर्णयामुळे सरकारी शाळेतील शिक्षक, व अन्य कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहेत, आजच अनेक सरकारी कार्यालयात खाजगी  एजन्सी मार्फत सर्वत्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जातआहे ,परमनंट सरकारी नोकर भरती, कायमस्वरूपी बंद करण्यात आली असून सरकारचा हा निर्णय शिक्षक,कर्मचाऱ्यांचे जीवनअस्थिर करण्याचा असून सरकारी  जनविरोधी धोरणाविरोधात ,जनआक्रोश, जनजागृती होणे आवश्यक आहे,  

तसेच upsc मार्फत विद्यार्थी 4 ते5 वर्षं अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात, परंतु केंद्र सरकार आपल्या मर्जीतील लोकांना कसलाही अभ्यास ,कसल्याही परीक्षा न घेताच 1नंबरच्या पोस्ट अधिकारी म्हणून नेमणूक केली जात आहे, देशासाठी सदर निर्णय अत्यंत घातक व देश उध्वस्त करणारा आहे, सरकार मध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, ते मोठया प्रमाणावर अपरिपक्व व जनहिताला तिलांजली देणारे आहेत असे वाटते, कुठल्याही पक्षाचे आमदार ,खासदार, या विरोधात आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत, अपवाद असतील ही, आमदार, खासदार यांनी जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणे गरजेचे असताना अनेक आमदार, खासदार हे होयबा आहेत, राज्यपाल, राष्ट्रपती, यांच्याकडे तक्रार करून काही उपयोग होईल असे वाटत नाही, कारण ते त्यांच्या पक्षाची बांधिलकी असणारे आहेत, 

आरोग्य सेवा  ही नावालाच सेवा आहे,  हॉस्पिटल गोरगरीबांना उपचार घेणं परवडणारे नाही,विविध चाचण्या,औषध यावर खूपच खर्च करावा लागतो, अनेक रुग्ण मरण स्वीकारतात,हे भीषण वास्तव आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, सरकारने सर्व आरोग्याच्या योजना बंद करून सर्वांना मोफत उपचार मिळावेत असा निर्णय अपेक्षित आहे, नाही तरी हॉस्पिटलच्या नावाखाली अपरिपक्व शिक्षण सम्राटांनी पैसे कमावण्याचं साधन म्हणून डॉक्टर बनवण्याचे कारखाने सर्वत्र निर्माण केलेआहेतच, 

जन हो सावधान,सरकारच्या निर्णयाचा त्रास आपणाला ही भोगावा लागेल,चला माणुसकीच्या शत्रू संगे लढू या, सामान्य माणसांचे जनआंदोलन उभे करू या रिपब्लिकन नेते राजाराम खरात यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता राजाराम खरात, 8879126103 या क्रमांकावर संपर्क साधा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com