Top Post Ad

१५ लाख घेतांना ईडी अधिकाऱ्यास अटक


 ईडी अधिकारी नवल किशोर मीना आणि त्याचा साथीदार बाबूलाल मीना यांना राजस्थान भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हणजेच एसीबीने अटक केली आहे.  खैरथल तिजारा जिल्ह्यातील मुंडावर येथे एका व्यक्तीकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. . तक्रारदाराने एसीबीला याप्रकरणाची आधीच माहिती दिली होती. इम्फाळमधल्या एका चिटफंड प्रकरणाता अटक न करण्यासाठी नवल किशोर मीना यांनी १७ लाखांची लाच मागितली होती. यातील १५ लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. ईडी  इंस्पेक्टरच्या अनेक ठिकाणांवर एसीबी कारवाई करत आहे. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.   

मणिपूरमध्ये एका चिट फंड कंपनी प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी तसेच अन्य सुविधा देण्याच्या नावावर पीडिताकडून १७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यातील १५ लाख रुपये देण्याचे कबूल केले. ही रक्कम देताना ईडी अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. अधिकाऱ्याच्या सहकाऱ्यालाही पकडण्यात आले आहे. अलवरमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाने खळबळ माजली असताना एसीबीचे अन्य अधिकारीही अलवरमध्ये दाखल होत आहेत. एसीबीला संशय होता की, अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याने बेहिशोबी मालमत्ता जमवली आहे. त्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. तसंच त्या अधिकाऱ्याशी संबंधीत काही जागांवर छापेमारी करण्यात आली. नवल किशोर मीना हे अंमलबजावणी संचालनालयात ईओ म्हणून कार्यरत आहेत. चिटफंडशी संबंधित प्रकरण बंद करण्यासाठी तसंच मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि अटकेपासून वाचवण्यासाठी १५  लाख रुपयांची लाच मागितल्याचा नवल किशोीर मीना यांच्यावर आरोप आहे.याप्रकणी एसीबीने एक निवेदन जारी केलं आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com