Top Post Ad

... तर 31 डिसेंबरपासून होणार गुगल पे, पेटीएम आणि फोनपे बंद


  ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेव ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत. अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. तुमचा जुना नंबर नवीन यूजर्सना जारी केला जातो. अशावेळी फसवणूक होण्याची शक्यता असते, असे सांगत न्यायालयाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व कारणांमुळे जुना आयडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरसंचार प्रदाता कंपन्या 90 दिवस उपयोगात नसलेले नंबर निष्क्रिय करू शकतात. तसेच ते नंबर दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतात, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या ताज्या निर्णयांत म्हटले आहे. जर तुमचा यूपीआय आयडी गेल्या एका वर्षापासून सक्रिय झाला असेल. याचा अर्थ. जर तुम्ही त्या यूपीआय आयडीने व्यवहार करत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. तसेव. कोणत्याही विवादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते. भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन अर्थात NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ला एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये NPCI ने गुगल पे. फोन पे आणि पेटीएम सारख्या थर्ड पार्टी अॅप्सना महत्वाचे निर्देश दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com