Top Post Ad

५३१ कोटीं खर्चाचा तीर्थक्षेत्र सुधारित आराखडा... मंत्रीमंडळाची मान्यता


 

 श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाचा २८६.६८ कोटी रुपयांचा सुधारित विकास आराखडा, श्रीक्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटी रुपयांच्या सुधारित आराखडा  असा एकूण सुमारे ५३१ कोटी खर्चाच्या सुधारित आराखड्यास शिखर समितीच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. 

मंत्रालयात झालेल्या शिखर समितीच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रशांत बंब, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

श्रीक्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ९२ कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाइट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे. लेझर शो करताना नागरिकांच्या डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. श्रीक्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यामध्ये वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आले आहे. लेणी क्रमांक एक ते महादेव मंदिर हा नवीन रस्ता १.६५० किमी लांबीचा असून त्यासाठी २७.५८ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर बांधकामासाठी १६ कोटींची वाढीव निधी यानुसार १६३ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. 

या बैठकीत श्रीसप्तशृंगी देवी विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी या तीर्थक्षेत्र विकासासाठी ८१.८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. हा सुधारित आराखडा २५ कोटींपेक्षा अधिक असल्याने तो ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सुधारित आराखड्यात स्वच्छतागृह बांधणे, डोम बसविणे, दरड कोसळण्यापासून संरक्षणात्मक जाळी बसविणे आदी विविध कामांचा समावेश आहे. याठिकाणी दोन दिवसांपूर्वीच भेट दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


गुरूवार १६ फेब्रुवारी२०२३ रोजी राज्य शासनाने अंबरनाथ येथील शिवमंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणाच्या रु. १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या सर्व मंजुरीचा अडथळा पार करत अंबरनाथ पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरणाच्या कामासाठी निविदा मागवण्यात होत्या. त्यानुसार आता या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या सुशोभीकरणाचे १०७ कोटींचे काम आता सुरू होत आहे. सावनी हेरिटेज कंझर्वेशन प्रा.ली. या कंपनीला या हे काम देण्यात आले आहे.  या कामाच्या उभारणीनंतर शिव मंदिर परिसराला नवी झळाळी प्राप्त होणार असून  अंबरनाथ येथील  शिवमंदिर एक धार्मिक स्थळ म्हणून  परिचित होणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com