Top Post Ad

...हा तर दलालांचा अड्डा - डॉ. सांखला

 


  भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे . असे ९ मार्च २०१६ ला भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे .झी न्यूज मध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४ % मानवी शस्त्रक्रिया फेक किंवा अनावश्यक केल्या जातात . याचा अर्थ, हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळ जवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात . याच रिपोर्ट मध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की भारतात केल्या जाणाऱ्या ५५ % हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात . ४८ % हिस्टेरोक्टोमी(गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७ % कॅन्सर सर्जरी, ४८ % गुढघे प्रत्यारोपण, ४५ % सिझेरियन (कृत्रिम प्रसूती), खान्देरोपण, स्पाईन सर्जरी ई .

        महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की, मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये सिनिअर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते . याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतांना अधिक तपासण्या, उपचार, एडमिट करणे आणि शस्त्रकीया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते . (BMJ GLOBAL HEALTH )

मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे . जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे . एका नामांकित हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना vhentilator वर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले . तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले . हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय ?

         अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो . त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते . नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करतांना मरण पावल्याचे जाहीर केले जाते .भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते . (DISENTING DIAGNOSIS- DR. GADRE& SHUKLA)

  इंस्युरंस म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे . भारतात सुमारे ६८ % लोकांनी मेडिक्लेम इंस्युरंस घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्स्यूरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते . बाकी सर्व खर्च रुग्णांच्या अभिभावकांना करावा लागतो   इंस्युरंसचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इंस्युरंस कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे . कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इंस्युरंस कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकीस आले होते .

मानवी अंगांची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो . इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे . हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा . संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नौकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते . कंपनीमध्ये नौकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित *“फोर्टिस”* हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली . सांगिताला रीतसर रुग्णालयात भरती करण्यात आले . परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे DONAR वैगेरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तीने तिथून पळ काढला . ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार  सांगितल्यावर उलट त्याने सांगिताला धामकाविले आणि ५० हजार रुपये मागू लागला . तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली . पोलिसांनी तपासणी अंती एका मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास झाला . पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केलें आहे की, या प्रकरणात पोलीस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामिल होते .  

हॉस्पिटल रेफरल स्कॅम* हा तर सर्वांना माहित असलेला आणि सर्रास चालणार प्रकार आहे . आपला परिचित किंवा इतर कोणताही डॉक्टर रुग्णाला गंभीर आजार आहे असे सांगून मोठ्या नामांकित हॉस्पिटलला एड्मिट होण्यास सांगतात . *अपोलो, फोर्टिस, अपेक्स इ. अनेक हॉस्पिटलचे रेफरल मेंबर असतात .* असे हॉस्पिटल्स डॉक्टर साठी रेफरल ट्रेनिंग प्रोग्राम घेतात . मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलने तर वार्षिक ४० रुग्ण पाठविण्यासाठी एक लाख रुपये, ५० रुग्णासाठी दीड लाख रुपये, ७५ रुग्णासाठी अडीच लाख रु. देण्याचे लिखित स्वरुपात जाहीर केले होते . रुग्णाला काही झालेले असो अगर नसो फक्त रुग्ण पाठविण्याची रक्कम डॉक्टरच्या बँक खात्यात जमा केली जाते .

   *डायग्नोसिस स्कॅम* हा अत्यंत सरळ आणि सोपा कोट्यावधी रुपयांच्या लुटीचा प्रकार आहे . बंगुलुरू येथील काही नामांकित पेथोलॉजी LABS वर इन्कम TAX विभागाच्या धाडीमध्ये अनेक LABS कडे १०० कोटीच्या वर रुपये कॅश आणि साडेतीन किलो सोने आढळून आले होते . पुढे असे आढळून आले की डॉक्टरांना देण्यासाठी ते ठेवण्यात आले होते . रुग्णाला काही झाले असो किंवा नसो डॉक्टर्स रुग्णांना चेकअप साठी पाठवितात . तिथून त्यांना ४०–५० % कमिशन मिळते .जबरदस्ती केलेल्या या चेकअप मधील १ ते २ तपासण्या करून बाकी सर्व रिपोर्ट हेराफेरी करून दिले जातात . हा धंदा तर फारच नफेखोरीचा आहे . त्यामुळेच देशात सुमारे दोन लाखाच्या वर LABS कार्यरत आहेत . परंतु यातील फक्त एक हजारावर LABS प्रमाणित आहेत .

  असाच एक मोठा स्कॅम फार्मा कम्पन्या सुद्धा चालवितात . देशातील २० ते २५ मोठमोठ्या औषधी कम्पन्या डॉक्टरांवर एक-एक हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात . *डोलो गोळी विकणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण कोरोना काळात जगजाहीर झाले आहे .* डॉक्टरने आपल्या कंपनीचे औषध लिहावे म्हणून त्यांना लाखो रुपये कॅश, विदेश दौरा, पंचतारांकित हॉटेलमध्ये ५ ते ७ दिवसांचे वास्तव्य ई . USV LTD. कंपनी तर प्रत्येक डॉक्टरला ३ लाख रु. कॅश ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका ट्रीप देते .

 *हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्याचे एक वेगळे स्कॅम आणखी आहे .* अनेक फार्मा कम्पन्या मोठ्या हॉस्पिटल्सना औषधी, सर्जिकल साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देतात . त्यावर MRP मात्र प्रचंड असते . इंडिया टुडेने याचा पुरावा देत सिद्ध केले आहे . *EMCURE कंपनी* आपले *टेमीक्युअर हे कॅन्सरचे औषध हॉस्पिटलना १९५० रुपयांना देते . हॉस्पिटल्स मात्र रुग्णाकडून या औषधाचे १८६४५ रुपये वसूल करतात .* यात सर्व हॉस्पिटल्स सामील आहेत . (इंडिया टुडे हॉस्पिटल स्कॅम सर्व्हे रिपोर्ट)

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) ही डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे . २०१६ मध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली . या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की, MCI नवीन मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात खूप उत्सुक असते मात्र डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण करण्यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे .

देशातील डॉक्टर MCI च्या नियमांची रोज पायमल्ली करतात, परंतु याची जनतेला कल्पना नसते .

  •  उदा .
  • १.       डॉक्टरने कोणत्याही कंपनीचे ब्रान्डेड औषध लिहायचे नसून साल्टचे जेनेरिक नाव लिहिले पाहिजे .  
  • २.       क्लौज १.८ नुसार उपचार करण्याआधी डॉक्टरने आपली संपूर्ण फी सांगितली पाहिजे . इ. अनेक नियमांचे उल्लंघन रोज केले जाते .
  • ३.       तपासण्या आणि उपचार करण्यापूर्वी रुग्णाला योग्य माहिती देऊन त्याची स्विकृती घेणे आवश्यक आहे .
  • ४.       प्रत्येक रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड येणाऱ्या ३ वर्षांसाठी डॉक्टरने सुरक्षित ठेवले पाहिजे .
  • ५.       व्यवसायातील भ्रष्ट, अनैतिक, अप्रामाणिक आणि अक्षम डॉक्टरांचे वर्तन कोणतीही भीती न बाळगता समाजासमोर आणले पाहिजे . इ.

 शासकीय योजनांचा स्कॅम हा नवीन आणि अफलातून प्रकार तर हल्ली हजारो कोटींचा झाला आहे . माजी सैनिक हॉस्पिटलला गेला की, त्याला फक्त सर्दी किंवा इतर किरकोळ समस्या असेल तरीसुद्धा एडमिट केले जाते . त्याच्या कार्डवरून त्याच्या नकळत एखाद्या सरकारी योजनेत बसविले जाते. रुग्णावर नको ते उपचार करण्याचा देखावा केला जातो . ७/८ दिवसात सुटी दिली जाते . तोपर्यंत त्याचे लाखोंचे बिल सरकारी योजनेतून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने डॉक्टरच्या खात्यात जमा झालेले असते . अर्थातच खोट्या चेकअप आणि तपासण्याचा, उपचारांचा कागदोपत्री आधार याला द्यावा लागतो .  


हॉस्पिटल .....?  - डॉ.सांखला.     
सर्व पापांचे ते मूळ, जे कुकर्माचे फळ |
देहक्लेशाची वाडी, तापत्रयाची ती शेगडी ||
दैन्य दु:खाचे दुभटे, महा भया वाढवते |
जे दुर्मतीचे मूळ, भ्रमाचे स्वरूप केवळ ||
वैऱ्याचा जो पाहुणचार, दुर्जनांनी दिलेला आदर |
सकळ रोगांचे आगर, निरुपयोगी ज्यामुळे नर ||
जो चेटकिणीचा कळवला, नि चोरांचा जिव्हाळा |
लबाडाघरचे आमंत्रण, कालसर्पाचे मृदू आलिंगन ||
सकळ जन आरोग्यहीन, दलालांचे भव्य दालन |
गुलामांचे ते भूषण, लाचारांचे आश्रयस्थान ||
हॉस्पिटल धंदा अनर्थाचा, लुटारू आणि शोषकांचा ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com