Top Post Ad

बेकायदेशीररित्या हिरानंदानी मधील मिळकतीवर बँकेची जप्ती


 बेकायदेशीररित्या हिरानंदानी मधील मिळकतीवर जप्तीचा प्रयत्न करणाऱ्या बँक आणि सरकारी बाबूंवर  ठाण्यातील महाराष्ट्र लोकाधिकार समितीची धडक कारवाई

ठाण्यात हिरानंदनी, घोडबंदर येथे आयसीआयसीआय बँकेकडून बेकायदेशिररित्या  करीत असलेल्या घर जप्तीला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष तथा संघटक धनाजी सुरोसे आणि त्यांच्या टीमने रोखले. डॉ. डिंगणकर फॅमिलीने आय सी आय सी बँक कडून घर घेण्यासाठी अर्थसाह्य म्हणून एक करोड रुपये घेतले होते. घेतलेल्या अर्थसाह्याची परतफेड वेळोवेळी केलेली आहे. जवळ जवळ साठ लाखाच्या वर  रक्कम भरणा केला असताना देखील एक करोड वीस लाख रुपयेच्या अवाजवी रक्कमेच्या मागणी साठी कर्जदार मायनॉरिटी जातीतील येत असल्याकारणाने  जाणीवपूर्वक षडयंत्र करून मिळकत हडप करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला होता. 

सदर प्रकरणामध्ये डीआरटी न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर  न्यायप्रक्रिया चालू असताना व ती प्रकरणे न्यायप्रवीष्ठ असताना देखील कोणतीही कायदेशीर बाजू न पाहता या प्रक्रियेला बगल देत  जुन्या आदेशाचा वापर करून तहसीलदार युवराज बांगर हे  बँकेच्या फायद्यासाठी संगनमताने आपल्या कर्मचाऱ्यांसहित आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्जदाराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करित आहेत ही बाब मोठी लज्जास्पद आहे. प्रशासनातील अधिकारी अश्याप्रकारे जर काम करित असतील तर त्यांचे हे गैरप्रकार शासन, प्रशासनाच्या पटलावर आणण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा सुरोसे यांनी दिला.  यावेळी समितीचे सिद्धांत चासकर, स्वप्निल मोठे, विनोद साळवे, अजिंक्य थोरात  व अन्य सहकारींच्या मदतीने जप्तीकरिता आलेल्या बँक अधिकारी, तलाठी, पोलीस यांना लोकाधिकार समितीने जशास तसे उत्तर देऊन परतवून लावले.

 सदरची जप्ती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत आहेत ! तसेच बँक अधिकारी, कर्मचारीकडून होत असलेल्या नाहक त्रासामूळे व चाललेल्या मनमानीमूळे कर्जदार यांची मानसिकता खालावली आहे. सूडबुद्धीने बँक स्वतःच्या फायद्यासाठी पोलिस व तलाठी यांना  हाताशी धरून जप्ती करण्यासाठी आटापिटा करीत असल्याची बाब निदर्शनास येत होती. पोलीस प्रशासनाचे वागणे ही बँकेचे नोकर असल्यासारखे एकतर्फी होते ! याचे आश्चर्य वाटण्यासारखे आहे ! यानंतरही अशी बेकायदेशीर जप्ती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावेळीही जशास तसे ऊत्तर दिले जाईल असे स्पष्ट मत  धनाजी सुरोसे यांनी यावेळी व्यक्त केले. डिंगणकर कुटुंबाने सहकार्याबद्दल समितीचे व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com