Top Post Ad

भीडेवाड्यातील पहिली मुलींची शाळा... राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा


 महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात जिथे देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी  प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. कारण, भीडेवाड्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला आहे. त्यामुळे लवकरच या शाळेच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाची उभारणी होईल अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातल्या बुधवार पेठ परिसरातील भीडेवाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली होती. या शाळेला राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी सर्वत्र होत होती. मात्र राजकीय हेवे-दावे आणि श्रेयवादात या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते. त्यातच  हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयात दाखल असणारा या प्रकरणाचा खटला पुणे महापालिकेने जिंकला आहे. यामुळे येथे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

भीडेवाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी त्या जागेचे मूळ मालक असलेल्या पुना मर्चंट बँकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्याशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्त्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बँकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बँकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले होते.

भीडेवाड्यामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पुणे महापालिकेने २१ फेब्रुवारी २००६ रोजी मान्यता दिली होती. वाड्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात तरतूद देखील करण्यात आली होती. याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९-२० च्या अंदाजपत्रकातही सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.याखेरीज याबाबत विविध स्तरांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. याला आता सर्वोच्च  न्यायालयाच्या आदेशानंतर यश मिळाले आहे. सावित्रीमाई या खऱ्या अर्थाने शिक्षणाची देवी आहेत. राज्य शासनाने आता हा विषय ‘मोस्ट प्रायोरिटी’वर घेऊन हा विषय मार्गी लावावा, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट चर्चेत आली होती. ज्यामुळे पुन्हा एकदा भीडेवाडा अर्थात फुलेंची शाळा चर्चेला आली होती...... 

आज मैत्रीण विचारत होती की, दगडूशेठला येणार का ग!
मी तिला विचारले की,तुला माहीत आहे का ग भीडेवाडा कुठे आहे म्हणून.तर ती मला म्हणाली की काय आहे भीडेवाडा?
माझ्या डोक्यात एवढी सनक गेली ना....जिथे मुलींची पहिली शाळा चालू झाली तो भीडेवाडा नाही माहीत हिला.
पण नंतर लक्षात आलं,त्या बिचारीची काही चूक नाही.चूक तर ह्या व्यवस्थेची आहे.
जास्त काही बोलत नाही.फक्त एवढंच म्हणेल की,
दगडुशेठला हात जोडले की,
भीडेवाड्याला पाठ होते...!
हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं!

- योगेश्वरी भोसले. (Facebook Post)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com