Top Post Ad

आंदोलनाच्या आक्रमकतेमुळे कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द


  राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये नऊ खाजगी कंपन्यांमार्फ़त कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारणर घेतला होता . सदर निर्णयामुळे सरकारमधील आरक्षित जागा धोक्यात आल्यामुळे भीम आर्मीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता . राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान भीम आर्मीने कंत्राटी कारण रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटील यांच्यावर शाईफेक करीत त्यांना काळे झेंडे दाखविले होते . मुंबईत भाजप प्रवक्ते आमदार रॅम कदम यांच्या कार्यालयावर आंदोलन केलेले होते पुण्यातही आंदोलन झाले होते शिवाय  सरकारमधील सर्व मंत्री तसेच सत्तेतील खासदार आमदारांच्या कार्यालयावर आंदोलन करून हे कंत्राटीकरण रद्द करण्याचे निवेदन त्यांना देण्याचे निर्देश सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले होते . तसेच याबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याकरिता पुणे ते मंत्रालय अशा लॉँग मार्चची तयारी केल्यामुळेच सरकारने आपला निर्णय रद्द केला असा दावा भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी केला आहे . 

तर कंत्राटीकरणाचा शासन निर्णय वंचितांच्या एकजुट लढ्यामुळे रद्द करण्यात आला असल्याचा दावा  सुजात आंबेडकर यांनी केला आहे. राज्यात शिंदे - भाजप सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलने करून हा निर्णय रद्द करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यभरात सातत्याने केलेले आंदोलने, पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि आज कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेत या निर्णयाला प्रखर विरोध दर्शवला होता व सरकारला इशारा दिला होता की, वंचित-बहुजन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कदापि खेळू देणार नाही.  वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या निर्णयाविरोधात राज्यभर प्रभावी आंदोलने करत या निर्णयाविरोधात रान उठवले होते. अखेर सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला. 

  राज्य सरकारने सरकारमधील कंत्राटी भरती शिक्षक भरती आणि कंत्राटी पोलीस भरतीच्या विरोधात पुणे ते मंत्रालय अश्या लॉंग मार्चची तयारी भीम आर्मीने केली होती. सर्व समविचारी संघटना आणि पक्ष यांच्या सहभागाने हा लॉन्ग मार्च भीम आर्मीच्या नेतृत्वाखाली निघणार होता त्याचे मोठ्या स्तरावर नियोजन सुरु होते आधीच राज्यात मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणामुळे सरकारविरोधी वातावरण पेटलेले आहे संपूर्ण राज्यात सरकारच्या या  निर्णयाविरोधात वातावरण तयार झाले होते त्यामुळे लॉन्ग मार्चची ही धग सरकारला बसू नये यासाठी सरकारने हा निर्णय रद्द केला असा दावा भीम आर्मीचे गंगावणे यांनी केला . कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्यानंतर गंगावणे यांनी सरकारचे अभिनंदन करतानाच आता कंत्राटी शिक्षक आणि पोलीस भरतीचा निर्णय देखील रद्द करावा अशी मागणी केली आहे 

वंचित बहुजन आघाडीने नांदेड, परभणी,अकोला, सांगली, लातूरसह राज्यभरात आंदोलन केले होते आणि आज त्या आंदोलनाचे यश आपल्या सर्वांना मिळत आहे. आज एका पातळीवरती वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे विद्यार्थी जे या आंदोलनात न घाबरता सहभागी झाले आणि सगळे कोचिंग क्लासेस चालवणारे प्राध्यापक, शिक्षक यांनी न घाबरता भूमिका घेतली आणि आंदोलनाला यश आणण्याचे काम केले. त्या सगळ्यांचे आभार मानतो. सरकार कोणाचेही असो जर ते इथल्या गोरगरिबांच्या, कष्टकर्यांच्या, शेतकर्यांच्या, तरुणांच्या आणि तमाम वंचित बहुजन समाजातून आलेल्या तरुणांच्या  विकासाच्या आणि जीवनाशी जर ते आडवे आले, तर वंचित बहुजन आघाडी त्यांना आडवे करण्याच काम करेल. ज्याप्रकारे आपण कंत्राटीकरनाचे आंदोलन उभे केले, ते मार्गी लावलं आणि सरकारला आपल्यापुढे झुकवून तो जीआर मागे घ्याला लावला. त्याच पध्दतीने आम्ही यापुढे सुद्धा इकडच्या तरुणांच्या समस्यांवरती आवाज उचलू व त्यावर मात करण्यासाठी काम करू, -  सुजात आंबेडकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com