Top Post Ad

सुरेश होनाजी ढोमे राज्यस्तरिय आदर्श संचालक पुरस्काराने सन्मानित


 जी.एस.महानगर सहकारी बँकेेचे ज्येष्ठ संचालक तसेच सहकरातील कुशल संघटक सुरेश होनाजी ढोमे यांना दैनिक नवभारत -नवराष्ट्र समूहातर्फे सहकार पुस्कार -२०२३ मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श संचालक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 मुंबईतील कफ परेड येथील हाँटेल ताज प्रेसिडेंट मधील आयोजित विशेष सोहोळ्यात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार सुनिल तटकरे,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला..
     याप्रसंगी महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करशेठ कवाद,ज्येष्ठ संचालक रामचंद्र तिकोणे,व सतिश खणकर तसेच नितीनशेठ चिकणे,विनायकराव आव्हाड (बीड), लहू रामभाऊ घुले,चंदूशेठ होनाजी ढोमे,उद्योजक विनायकराव होनाजी ढोमे व ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साळसकर आदि मान्यवर त्यांच्यासोबत पुरस्कार घेतेवेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 
    सुरेश ढोमे हे गेली पंधरा वर्षे महानगर बँकेचे सक्रीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.महानगर बँकेच्या जडणघडणीत ढोमे यांचा मोलाचा सहभाग असून सुरेश ढोमे हे सहकारातील एक कुशल संघटक म्हणून सुपरिचित आहेत.महाराष्ट्र मोटार मालक संघटनेत ते अध्यक्ष ते कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर गेली वीस वर्षे कार्यरत आहेत.सध्या ते या संघटनेत कोषाध्यक्षपदी कार्यरत आहेत. सुरेश ढोमे यांनी पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक तसेच आसपासच्या गावातील अनेक धार्मिक तसेच शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदती द्वारे आजवर सहकार्य करीत आले आहेत. कोवीड काळात त्यांनी अनेक संस्थांना तसेच अनेक गरजूंना आर्थिक तसेच विविध प्रकारे मदत केली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांनी कोवीड योद्धा पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या समाजसेवी कार्याचा यथोचित गौरव केला आहे. तसेच कांतीलाल कडू यांच्या पनवेल संघर्ष समितीच्या वतीने ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभहस्ते कोवीड संजी्वनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com