Top Post Ad

हवेची गुणवत्ता खालावली... भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार


     ऐन उत्सवाच्या दिवसातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतचे ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. कालपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता 'मध्यम खराब' श्रेणीत पोहचली असून त्यामुळं सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता तब्बल १२७ एक्यूआय इतकी नोंदवण्यात आली आहे. मुंबईला लागूनच ठाणे शहर असल्याने ठाण्यात देखील ही बाब निदर्शनास येत आहे.  आता सतत वाढत असलेल्या वायु प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार तसेच महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रदूषणाची गंभीर दखल घेत प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जारी केल्या आहे.

हवामान संस्था सफरने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या बोरिवलीतील हवेची गुणवत्ता १०१ एक्यूआय, मालाडमध्ये १२५ एक्यूआय, नवी मुंबईत १५२ एक्यूआय, माझगावमध्ये १२१ एक्यूआय आणि कुलाब्यातील हवेची गुणवत्ता १४२ एक्यूआयवर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. रविवारी मुंबईतील एक्यूआय हा १२७ वर पोहचला होता. मॉर्निंग वॉकला किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या लोकांना दाट धुकं आणि खराब हवेचा सामना करावा लागला. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता ही मध्यम श्रेणीत असून त्याला कमी करण्यासाठी उपययोजना करण्यात येत आहे.

वायु गुणवत्ता निर्देशांक हे चांगलं, समाधानकारक, मध्यम प्रदूषित, वाईट, अत्यंत वाईट आणि गंभीर अशा सहा AQI श्रेणीत मोजलं जातं. या श्रेणीनुसारच शहरांमध्ये अलर्ट दिले जातात. तसेच लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होवू शकतात, याचा अंदाज लावला जातो. ० ते ५० एक्यूआय असेल तर हवेची गुणवत्ता चांगली मानली जाते. ५१ ते १०० एक्यूआय दरम्यान समाधानकारक, १०१ ते २०० दरम्यान मध्यम, २०१ ते ३०० दरम्यान खराब, ३०१ ते ४०० पर्यंत अत्यंत वाईट, ४०१ ते ५०० पर्यंत गंभीर आणि ५०० एक्यूआयवरील हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर श्रेणीत गेल्याचं मानलं जातं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com