Top Post Ad

टोल का झोल... किसको कितना मिलता है बोल...

  टोलवसुलीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कचाट्यात पकडले होते तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही कोंडी केली आहे. मुंबईतल्या वेशींवरील टोलनाक्यांनी १ ऑक्टोबरपासून दरवाढ केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. एवढेच नाही तर टोल म्हणजे राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.  टोलविरोधी आंदोलन राज्यभरात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिलेल्या टोलवरील प्रतिक्रियेच्या व्हिडीओवरून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मोठ्या कमर्शियल वाहनांवर टोल आकारला जातो, असे स्पष्ट केले आहे. हे खरे असेल तर इतकी वर्षे लहान चारचाकी गाड्याकडून वसूल केलेला टोल कुणाच्या खिशात जातो, असा सवाल उपस्थित होत आहे.  ‘जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे ४ व्हीलर आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिली आहे केवळ मोठ्या कमर्शियल गाड्यांवर टोल आपण घेतो. आणि त्याचे पैसे राज्य सरकार देते.’ या फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांना फैलावर घेणारे ट्वीट केले आहे. 

”उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात की, सर्व लहान खासगी वाहनांना महाराष्ट्रात टोलमाफी आधीच लागू. हे धांदात खोटं आहे. आता यापुढे माझे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यांवर उभे राहतील आणि लहान वाहनांचना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू.” असे राज ठाकरेंच्या नावाने ट्वीट केले आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस टोलबाबत काय म्हणाले आणि त्यावर राज ठाकरेंचे ट्वीट यामुळे फडणवीस कोंडीत सापडले आहेत. 

आता हे कमी म्हणून की काय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी तर देवेंद्र फडणवीस टोलसंदर्भात काय बोलले होते याचा व्हिडीओ शेअर करत, ‘म्हणजे ऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!, असे ट्वीट केले आहे’.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com