नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा समस्या बाबत व शहरातील विकास प्रकल्पबाबात खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात घेतली बैठक
नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा समस्याबाबत तसेच खासदार राजन विचारे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून नवी मुंबई शहरात सुरु केलेल्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक आयोजित केली होती त्यावेळी विविध मुद्यावर विस्तृत चर्चा केली त्यावेळी बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे,ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर,नवी मुंबई महिला संघटिका रंजना शिंत्रे,उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर,दिलीप घोडेकर,प्रकाश पाटील,सूर्यकांत मढवी, ,मिलिंद सूर्यराव,शहरप्रमुख विजय माने मा.नगरसेवक एम.के.मढवी,सोमनाथ वासकर,चेतन नाईक, व इतर शिवसेना पदधिकारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते .
नवी मुंबईतील शहरात वाढणाऱ्या दळणवळणामुळे नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नवी मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेले उद्यान ,मैदान, पार्किंग, रस्ते व इतर सुविधा भूखंड यांची भविष्यात कमतरता भासण्याची दाट शक्यता लक्षात घेता यासाठी शहराच्या विकास आराखड्यात सन २०३८ पर्यंतचा भविष्यात वाढणाऱ्या लोकसंखेचा विचार करून सिडको कडून सहाशे नवीन भूखंड मिळवण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत काय प्रयत्न केले याचा जाब जाब महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना विचारला असता सिडको व महापालिका महापालिका याबाबत फेर बैठका घेऊन नोव्हेंबर पर्यंत राज्य शासनाकडे पाठवून वर्षभरात निर्णय घेतील असे सांगण्यात आले
नवी मुंबई शहरातील काही गावठाण भागात व शहरी भागात जुन्या टाकलेल्या ड्रेनेज वाहिन्या व जल वाहिन्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे बदलणे गरजेचे असल्याने महापालिकेने याकडे लक्ष देऊन याबाबत योग्य पावले वेळेत उचलावेत तसेच शहरात विकास बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरल्यामुळे जे कर धारक आहेत त्यांना मुबलक पाणीपुरवठा मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिक यांच्यावर काही निर्बंध घालावे अशा सूचनाही खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांना दिल्या तसेच घनसोली व कोपरखैरणे या भागात कंडोमनियम अंतर्गत उभ्या राहिलेल्या वसाहती चाळीस वर्षाहून जुन्या झाल्याने या वसाहतीतील कुटुंब संख्या वाढल्याने त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पाणी व ड्रेनेज लाईनची कामे करण्यासाठी महापालिकेने धोरण अवलंबावे त्यावेळी उदाहरण देताना नगर विकास विभागाकडून आलेला निधी त्या ठिकाणी वापरू शकता शकता तर महापालिका चा निधी का वापरू शकत नाही यामध्ये दुजाभाव करू नये या कर धारकांना त्यांच्या मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांकडे धरून धरिली
दिघा व तुर्भे परिसरात दाट लोकवस्ती असल्याने विद्युत वाहिन्या ओवरेड असल्याने त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या दुर्घटना वारंवार घडत असल्याने त्या उर्वरित विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी महापालिकेने अर्थसहाय्य देऊन त्या करून घ्याव्यात ही मागणी पुन्हा एकदा आयुक्तांकडे केली
या नवी मुंबई शहरात चर्मकार समाजाची संख्या अधिक असल्याने त्यांना रोजगारासाठी स्टॉल परवाने मिळून द्यावे यासाठी मागील बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित केला होता चर्मकार समाज सन 2015 पासून याचा पाठपुरावा करीत परंतु महापालिकेने दिव्यांगांना परवाने दिले आहेत त्यामध्ये चर्मकार समाजाच्या ही लोकांना समावेश करून घेण्याची विनंती खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
सानपाडा येथील सेक्टर 10 येथील डी व्ही पाटील मास्तर मैदानात बसविण्यात येणारी खेळणी स्थानिकांच्या मागणीनुसार ती खेळणी सानपाडा येथील ओरिएंटल कॉलेजच्या मैदानात बसविण्याची विनती आयुक्तांकडे केली असता त्यांनी या संदर्भात फेरविचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी खासदार राजन विचारे यांना दिले . तसेच मोरवे धरणातून येणारी पाण्याची लाईन सानपाडा परिसरात घेण्यासाठी रेल्वे रूळ अडथळा ठरत असल्याने रेल्वेची परवानगी मिळवून घेऊ असे या बैठकीत ठरले
तसेच शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी व दुरुस्ती यासाठी महापालिकेकडून उपलब्ध निधी सत्ताधाऱ्यांच्या प्रभागातील कामे करण्यासाठी अधिक खर्च करायचे व उर्वरित प्रभागातील कामवर चर्चा करू असे फाईलवर रिमार्क करून कामे रोखावी या बाबत खासदार राजन विचारे यांनी आयुकताना असा दुजाभाव करू नये कारण प्रत्येक प्रभागातील कर धारक आपला कर महापालिकेकडे जमा करत आहे त्यामुळे योग्य आवश्यक ती कामे प्रत्येक प्रभागात सम प्रमाणात महापालिकेने करावी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांकडे केली
ज्वेल ऑफ नवी मुंबई यावर नवी मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक व निसर्ग रम्य परिसर विकसित केलेला आहे परंतु तलावाच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना भेडसावत असल्याने नागरिक या ठिकाणी फिरकत नाही या तलावात तुटलेल्या ड्रेनेज लाईन तसेच खाडीचे पाणी आत मध्ये येणारे वॉल याची दुरुस्ती अद्याप का केली नाही त्यामुळे येथे बसविण्यात आलेल्या वस्तूंची नाशाडी होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली त्यावर आयुक्त यांनी त्यासाठी अमृत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झालेला आहे डिसेंबर 2023 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले आहे
ज्याप्रमाणे वाशी येथे नागरिकांसाठी स्काय वॉक विकसित केलेले आहे त्याच धर्तीवर कोपरखैरणे सेक्टर 6 ते सेक्टर 8 गुलाब डेरी दरम्यान नागरिकांची अडचण लक्षात घेऊन क्रॉस करण्यासाठी खूप अडचणी नागरिकांना येत असल्याने या ठिकाणी स्काय वॉक फिजीबल नसेल तर कसे फिजीबल करता येईल या साठी प्रयत्न करावे अशी मागणी पुन्हा एकदा खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांकडे केली यावर सल्लागाराची नियुक्ती करून काम कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले आहे
खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने नवी मुंबई शहरात नव्याने विकसित होत असलेल्या कामांचा आढावा
घनसोली ऐरोली रोड रस्ता - १४ वर्षापूर्वी सिडकोने अपूर्ण अवस्थेत सोडलेला जोड रस्त्याच्या कामाला सिडकोकडून उपलब्ध केलेला निधी व पर्यावरण खात्याच्या सीआरझेड व एमसीझेडएम सर्व परवानग्या मिळवी ल्या असताना विलंब का लागत आहे यावर जाब विचारला असता एक हायकोर्टाची परवानगी बाकी आहे दोन महिन्यात मिळून जाईल त्यानंतर कामास सुरुवात होईल असे आयुक्तांनी सांगितले
गोठवली गावातील मैदान -घनसोली नोड मधील सिडकोच्या ताब्यात असलेल्या 15000 स्क्वेअर मीटरचा भूखंड खेळाच्या मैदानासाठी महापालिकेला मिळवून घेतला त्या मैदानाच्या विकासासाठी उपलब्ध खासदार निधी व महापालिका निधी या कामाची विचारणा केली असता संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झालेले आहे लवकरच पुढील कामालाही सुरुवात होईल असे आयुक्तांनी दिले
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम-बालवाडी पुणे येथे येथे महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवले आहे अनेक खेळाडू सरावासाठी त्या ठिकाणी जात असतात त्याच धर्तीवर नवी मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियमसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनीही या प्रस्तावास अनुकूलता दर्शवली होती परंतु या पुढील कार्यवाही करण्यास विलंब का लागत आहे त्यावर आयुक्तांनी सदर प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असल्याचे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे हा निर्णय लागतात पुढील कार्यवाही लवकर सुरू करता येईल असे सांगीतले
गवळीदेव - या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाच कोटी महापालिकेला दिला असताना या कामास विलंब का लागत आहे त्यावर आयुक्तांनी प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झालेले आहे व उर्वरित कामासही लवकरच सुरुवात होईल सांगितले तसेच हे काम वनविभागाकडे न देता महापालिकेनेच पूर्ण करावे असे खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांना सांगितले
सायकल ट्रॅक-नेरूळ पाम बीचवर मार्गावर नव्याने होणाऱ्या सायकल ट्रॅक ची कामाची स्थिती जाणून घेतले असता लवकरच याचेही काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे
बायोगॅस गॅस- ऐरोली प्रभाग क्रमांक ७ चिंचपाडा येथे खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून 70 लाख व महापालिका निधी खर्च करून बायोगॅस युनिटची उभारणी केली असताना त्याची स्थिती काय आहे याची विचारणा केली असता त्या युनिट मधून 121 घरांना गॅस पुरवठा तसेच या परिसरात स्ट्रीट लाईट योग्य प्रकारे सुरू आहे अशी ग्वाही आयुक्तांनी खासदार राजन विचारे यांना दिली
मत्स्यालय- नवी मुंबई हे शहर आगरी कोळी बांधवांचे शहर म्हणून ओळखले जाते या शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्याची मागणी खासदार राजन विचारे यांच्या कडून करण्यात आली होती त्याची स्थिती विचारले असता सदर प्रकरण राज्य शासनाकडे पाठवलेला आहे मान्यता मिळताच या कामात सुरुवात करण्यात येईल असे सांगण्यात आले
डबल डेकर बस -या नवी मुंबई शहरात नव्याने होत असलेले विकास प्रकल्प व खाडीकिनारी भाग लक्षात घेता पर्यटन स्थळे विकसित करण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे मुंबई दर्शन साठी डबल डेकर बस सुरु आहे त्याच धर्तीवर नवी मुंबई शहरातही डबल डेकर बस सुरू करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी यापूर्वी केली होती त्याची विचारणा केली असता येत्या महिन्याभरात ही बस सुरू होणार आहे असे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे
इलठण पाडा डॅम -ब्रिटिश कालीन असलेला डॅम मधील पाणी त्या परिसरातील नागरिकांना मिळून देण्यासाठी सदर डॅम रेल्वे कडून महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असताना महापालिकेकडून ती प्रक्रिया का थांबवण्यात आलेली आहे याची विचारणा केली असता रेल्वेचे पत्र न मिळाल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी दिली आहे
उड्डाणपूल
१)नेरूळ सेक्टर 28 ते महापालिका आयुक्त बंगला पर्यंत रेल्वे उड्डाणपुलाची स्थिती याची विचारणा केली निविदा काढण्याचे काम सुरू आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे
२) सेक्टर 17 पाम बीच मार्गावरील सायन पनवेल येथे जाण्यासाठी नवीन मार्गिका तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्या कामाची स्थिती विचारणा केली असता सहा महिन्यात याचे काम सुरू होणार आहे असे सांगण्यात आले
३ सायन -पनवेल हायवे मार्गावर सीबीडी सेक्टर 11 येथे नवीन उड्डाणपुलाच्या कामाची स्थिती विचारणा केली डीपीआर बनवायची काम सुरू आहे असे सांगण्यात आले
४ ठाणे बेलापूर मार्गावरील महापे उड्डाणपूलावर चढ उतार करण्यासाठी नव्याने तयार होणाऱ्या मार्गेकेची स्थिती याची विचारणा केली असता याचाही डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे असे सांगण्यात आले
५ ठाणे -बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोर जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो यासाठी जुईनगर या ठिकाणी एलिव्हेटेड उड्डाणपूल तयार करण्याची मागणी केली होती याची विचारणा केली असता या परिसरात काही वृक्ष तोड करावी लागणार आहे असे आयुक्तांकडून सांगण्यात आलेले आहे
चौक सुशोभीकरण - वाशी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणाच्या शिवकालीन इतिहासाची ओळख पटवून देणारा सुंदर पर्यटकांनाही भुरळ पडेल असा देखावा या शहरात सुप्रसिद्ध वास्तु विशारद यांच्याकडून तयार केला होता या कामाची स्थिती विचारली असता त्या ठिकाणी मंजूर केलेले काम न करता चौकाची गटार दुरुस्तीची कामे केली आहेत त्यावेळी खासदार राजन विचारे यांनी शासनाने या कामास स्थगिती दाखवल्याने यावर नाराजी दर्शवली असून त्यावेळी राजन विचारे यांनी जे काही सत्ताधारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात व त्यांच्याच कामाला स्थगिती देण्यास सांगतात जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल असे खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांना बोलले
या बैठकीच्या अंतिमेस नवी मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट असल्याने महापालिका कर्मचारी यांना बोनस वाढवून द्यावा तसेच त्यांना दिलेले मानधनही वाढवून द्यावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे
0 टिप्पण्या