Top Post Ad

२०२४च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण हवा आहे...


 ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे भाजपची नुकतीच  बैठक संपन्न झाली. ही बैठक घेत असताना ठाणे शहर, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरा-पाचपाखडी या मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणुक आढावा बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण हवा आहे असा प्रश्न विचारला असता यावर सभागृहात देवेंद्र फडणवीस असा गजर करण्यात आला. आम्हाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे आहेत असल्याचा सूर सभागृहातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावला.  या उत्तरावर बावनकुळेंनी लागा कामाला असे आदेश दिले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात नविन चर्चा होऊ लागल्या आहेत.

राज्यात काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी बंड केले आणि सत्ता स्थापन केली. त्यावेळी अजित पवारच मुख्यमंत्री होतील असा सुर प्रसिद्धी माध्यमांतून  होता. तसेच अजित पवार गटालाही तशी आशा होती. मात्र भाजपच्या केंद्रीय कार्यकारीणीने दिलेले आदेश अजित पवार यांनी पूर्णत्वास नेले नसल्याने त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही अशी नंतर चर्चा सुरु झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा अपात्र आमदारांची टांगती तलवार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणीसच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या ठाणे बालेकील्ल्यातून दिल्या आहेत. यामुळे आता राजकारणाला वेगळा रंग चढू लागला आहे.

महाविकास आघाडीला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील आमदारांशी जवळीक केली. शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले. नंतर अजित पवार यांचा नंबर लागणार होता.  मात्र आता या युतीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात शिंदे गट आहे. तर दुसऱ्या बाजूला येत्या काळात अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळवून देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची जोरदार तयारी सुरू आहे. १७ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस ठाण्यात लोकसभा-विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आले असता ठाणेकरांनी भविष्यातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हवेत अशा घोषणा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर तशी पोस्टरबाजीही ठाण्यात करण्यात आली आहे. ठाणे स्टेशन परिसर नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भाजपमय करण्यात आला असून सगळीकडे भाजपच्या नेत्यांची पोस्टर्स झळकवण्यात आली असल्याने आता ठाण्यात शिंदेगटाला भाजपचेच आव्हान राहणार असून, सोबत घेऊन सहकारी पक्षांना संपविण्याची भाजपची जुनीच निती असल्याची चर्चा मात्र ठाण्यात रंगली आहे. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com