इंडिया या शब्दाला विरोध करणाऱ्यांनी इतिहास जाणून घ्यायला हवा. १७ सप्टेंबर, १९४९ रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात इंडिया व भारत या दोन नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. खरेतर संसदेत ८५ %.हून अधिक हिंदू सदस्य असताना, हिंदुस्तान या शब्दाला कोणीही मान्यता दिली नाही, उलट विरोधच केला. याप्रसंगी बोलताना संविधानाचे शिल्पकार या नात्याने बोलताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत केलेल्या भाषणात इंडिया या शब्दावर स्पष्टीकरण दिले असून, संसद सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर केलेला आहे.
स्पंदन प्रकाशनच्या वतीने रविवार,दि. १३ अॉगस्ट २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या, " बहुजनांच्या जम्बुद्वीपाचे महानायक" या ग्रंथाच्या पृष्ठ १५१ वर संदर्भ क्र.११० मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. संसद ही सर्वश्रेष्ठ आहे, परंतु सनातन धर्माच्याआडून हिंदू नव्हे ब्राम्हणी धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी इंडिया पर्यायाने भारत या नावाला विरोध करीत आहेत! आज इंडिया नको, उद्या भारत हटाव म्हणायला कमी करणार नाहीत. RSSची ही छुपी खेळी असून, गुगली टाकून भारतीय जनतेला गुमराह करण्यात येत आहे.
गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर 93236 32320
-----------------------------------------
भारत विरुद्ध इंडिया
55000 हजार वर्षे काळात सिंधू नदीच्या किनारी नागरी वस्ती निर्माण झाल्याने त्याला सिंधू संस्कृती म्हणून ओळखले जाते. बुद्ध काळात भारत देश जंबुद्वीप म्हणून प्रचलित होता.सम्राट असोकाच्या काळात भारताचे संबंध हे ग्रीक देशाशी असल्याने सिंधू नदी वरून भारत देशाला इंडोस म्हंटले जाऊ लागले.
अरब आणि मुस्लिम जेंव्हा भारतात आले त्यावेळी इथले लोक ओंगळवाणे राहत असल्याने त्यांना हीन - घाणेरडे दु - लोक म्हणजेच हिंदू ( पर्शियन भाषा भारतीय विश्व शब्दकोश प.बंगला लायब्ररी सर्वोच्च न्यायालय मान्यताप्राप्त) #वैदिक किंवा सनातन ग्रंथात जसे रामायण महाभारत वेद,उपनिषदे, पुराण यामध्ये कुठे ही हिंदू धर्म असा उल्लेख नसून वैदिक धर्म किंवा सनातन धर्म काही वेळा आर्य धर्म हे शब्द आले आहेत.
त्यामुळे वैदिक ग्रंथात आर्यांनी( ब्राम्हण) भारत देशाला भरत राजावरून भारत नाव ठेवले ( हे पौराणिक (काल्पनिक कथा) नाव असून ऐतिहासिक नाही) त्यामुळे मुघलांनी भारताला हिंदुस्थान म्हणून संबोधले.
इंग्रजांच्या राजवटीत इंग्रजनी सम्राट असोकाच्या काळात ग्रीक लोक भारत देशाला जे इंडोस ( ग्रीक भाषा,लॅटिन भाषा) म्हणत होते त्यावरून इंडोस चे इंग्रजीत इंडिया केले. देश स्वतंत्र झाल्या नंतर संविधान लागू झाल्यावर संविधानात कलम 1 मध्ये bhart that is India असा संवैधानिक स्पष्ट उल्लेख आहे
तात्पर्य इंडिया नाव हे मूळ नावांपैकी आहे त्यामूळे सध्या देशात इंडिया भारत नावावरून जो गदारोळ चालू आहे तो फक्त राजकिय स्टंटबाजी असून गेल्या वर्षात देशात वाढलेली महागाई,बेरोजगारी, खाजगीकरण,धर्मवाद जातीवाद,शेतकरी आत्महत्या, पक्ष फोडीचे राजकारण,विकासाच्या थापा आशा प्रत्येक आघाडीवर सरकार अपयशी ठरत असताना निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीती पोटी जनतेच्या मनात देशप्रेमाची नशा चढविण्यासाठी भारत विरुद्ध इंडिया हा सामना राजकीय स्वार्थासाठी खेळावला जात आहे.
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
विद्रोही राजन... ९१७२२ ९१४४८
0 टिप्पण्या