Top Post Ad

ओबीसींच्या बैठकांमध्ये तोंडाला उष्टी पाने पुसली जातात...

 


 महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी मराठा ओबीसीकरणाचा काढलेला जी.आर. व त्याविरोधातील ओबीसी जनतेच्या उग्र संतापाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची बैठक 29 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई सह्याद्रीवर आयोजित केली आहे. याबद्दल सर्वप्रथम आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. या बैठकीस ना. मुख्यमंत्र्यांनी बरेच मान्यवर अभ्यासू ओबीसी नेते निमंत्रित केलेले आहेत, त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन करतो.

या बैठकीच्या निमित्ताने मी काही बक्षिसे व पुरस्कार जाहीर करीत आहे. त्याची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे-
विषय-
1) मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटलांच्या उपोषणाला मुख्यमंत्र्यांसकट सगळे मंत्रीमंडळ भेट देतात व सातत्याने उपोषणाच्या ठिकाणी जावून व फोन करून जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठींबा देत असतात.
2) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी चंद्रपूरचा रविंद्र टोंगे हा ओबीसी तरूण 18 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला आहे. परंतू त्याची साधी विचारपूस अजुनपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतरांनी केलेली नाही.

बक्षिस-1:  5 हजार रूपये रोख बक्षिस व ‘‘ओबीसी भुषण मर्द पुरस्कार’’
बैठकीत उपस्थित असलेला जो ओबीसी नेता बैठक सुरु होताच मुख्यमंत्र्यांसमोर पुढीलप्रमाणे प्रस्ताव ठेवेल, त्या ओबीसी नेत्याला हे रोख बक्षिस व पुरस्कार भव्य ओबीसी अधिवेशनात देण्यात येईल.

प्रस्ताव- बैठक सुरू होताच बैठकीत असा प्रस्ताव मांडायचा की, जरांगे पाटलांच्या उपोषणाला महाराष्ट्र शासनाने जणू काय दत्तकच घेतले होते, अशा पद्धतीने सर्व मंत्री व मुख्यमंत्री तेथे जाऊन भेट देत होते. मात्र आमचा चंद्रपूरचा रविंद्र टोंगे हा ओबीसी तरूण उपोषणाला बसून 18 दिवस झालेत तरीही अजून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री का भेटायला गेले नाहीत, जरांगे पाटील तुमच्या मंत्रीमंडळाचा कोण लागतो? आणी आमचा रविंद्र टोंगे रस्त्यावर पडलेला वाटतो काय? हा 52 टक्के ओबीसींचा अपमान आहे. याबद्दल माननीय मुख्यमंत्री यांनी या बैठकीत माफी मागावी. लेखी माफी मागणे आवश्यक आहे.
रविंद्र टोंगे यांच्या उपोषणाला भेट देण्याची तारीख मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जाहीर करावी.
बैठकीत वरीलप्रमाणे मुद्दे मांडणार्‍या ओबीसी नेत्याला रोख दहा हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल व ‘‘ओबीसी भुषण मर्द पुरस्कार’’ भव्य ओबीसी अधिवेशनात देण्यात येईल. (महत्वाची सूचना- या घटनेचे व्हिडियो चित्रीकरण करून ते आमच्याकडे पाठवा)

बक्षिस-2ः 10 हजार रूपये रोख बक्षिस व ‘‘ओबीसी भुषण जहांमर्द पुरस्कार’’
 वरीलप्रमाणे दोन मुद्द्यांचा प्रस्ताव मांडून झाल्यावर जो ओबीसी नेता बैठकीत असे सांगेल की,
1)  52 टक्के ओबीसींचा अपमान केल्याबद्दल जो पर्यंत मुख्यमंत्री माफी मागत नाहीत, तो पर्यंत ही बैठक पुढे चालू देनार नाहीत. आधी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, तरच पुढील कामकाज सुरू होईल. असे सांगून जय ओबीसीच्या घोषणा बैठकीत देणे.
उपरोक्त कृती बैठकीत करणार्‍या ओबीसी नेत्याला दहा हजार रूपये रोख बक्षिस व ‘‘ओबीसी भुषण जहांमर्द पुरस्कार’’ भव्य ओबीसी कार्यक्रमात देण्यात येईल.  (महत्वाची सूचना- या घटनेचे व्हिडियो चित्रीकरण करून ते आमच्याकडे पाठवा)

बक्षिस-3ः 20 हजार रूपये रोख बक्षिस व ‘‘ओबीसी भुषण महामर्द पुरस्कार’’
बैठकीत वरीलप्रमाणे घटना घडत असतांना जो ओबीसी नेता सातत्याने जय ओबीसीच्या घोषणा देऊन बैठकीचे कामकाज थांबवून ठेवेल, त्या ओबीसी नेत्याला जर पोलीसांच्या मदतीने बैठकीच्या बाहेर काढण्यात आले, तर त्या ओबीसी नेत्याला रोख वीस हजार रूपयांचे बक्षिस व ‘‘ओबीसी भुषण महामर्द पुरस्कार’’ भव्य ओबीसी मेळाव्यात देण्यात येईल. (महत्वाची सूचना- या घटनेचे व्हिडियो चित्रीकरण करून ते आमच्याकडे पाठवा)


ओबीसी बहीणींनो व भावांनो!

2018 साली 14 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर असेच रणकंदण माजले होते. या संभाव्य मराठा-ओबीसीकरण आरक्षणाच्या विरोधात आम्ही ओबीसींनी आझाद मैदानात दोन मोर्चे व दोन धरणे आंदोलने केलीत. परंतू  आमचा ओबीसींचा विरोध डावलून शेवटी 28 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा-ओबीसीकरण आरक्षण विधयक विधानसभेत बिनविरोध मंजूर करण्यात आले. त्यासाठी त्याकाळी मराठा समाजाच्या किमान 10 बैठका फडणवीसांनी अअयोजित केल्या होत्या. त्यावेळी आम्ही मराठा-ओबीसीकरण आरक्षणाच्या विरोधात सातत्याने आंदोलने करीत होतो. आम्ही ओबीसींनी तत्कालीन मुख्यमंत्री मा. नामदार फडणवीसांकडे ओबीसी बैठकीची मागणी वारंवार केली. परंतू 15 दिवसात फडणवीसांनी एकही बैठक घेतली नाही. 

मराठा जातीच्या नेत्यांच्या 10-15 बैठका झाल्यावर आपल्या ओबीसीची एकादी बैठक ‘भीख’ म्हणून आयोजित करण्यात येते. या ओबीसींच्या बैठकांमध्ये आपल्या तोंडाला उष्टी पाने पुसली जातात. ठोस निर्णय होतच नाहीत. कारण या बैठकीत एकही ओबीसी नेता ठामपणे बोलतच नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची गोल-मोल भाषणे एकणे व शेवटी फुकटचा चहा ढोसलून बिस्कीटांवर ताव मारून हे ओबीसी नेते आनंदाने बाहेर पडतात. जणूकाही या ओबीसी नेत्यांना त्यांच्या घरी चहा-बिस्कीट मिळतच नाही. 

उद्याच्या 29 सप्टेंबरच्या बैठकीतही हेच घडणार आहे. ओबीसीच्या हिताचा एकही निर्णय या बैठकीत होणार नाही, हे मी तुम्हाला आत्ता या क्षणीच लेखी देत आहे. फक्त आश्वासने मिळतील. परंतू आमचे बरेचसे ओबीसी नेते इतके निर्लज्ज आहेत की, फक्त आश्वासनावर समाधान मानून फुकटचा सरकारी चहा ढोसलून व फुकटच्या बिस्कीटांवर ताव मारून आनंदाने बैठकीतून परत येतील. म्हणून मला ही बक्षिस योजना जाहीर करावी लागत आहे. बैठकीतील जे ओबीसी नेते उपरोक्तपैकी एकही बक्षिस घेण्यास पात्र ठरणार नाहीत, त्यांना कोणत्या नावाने ‘‘नामर्द’’ पुरस्कार जाहीर करावा, याचा विचार ओबीसी जनता करेलच, याची मला खात्री आहे. 

    

आपला ओबीसी कार्यकर्ता,
प्रा. श्रावण देवरे,
संस्थापक-अध्यक्ष, 
ओबीसी राजकीय आघाडी 
संपर्कः 94 227 88 546
ईमेलः obcparty@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com