Top Post Ad

राजकारणातील जातीभेद चव्हाट्यावर

 

   देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपच्या मोदी सरकारला २०२४ मध्ये पराभूत करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र, काही पक्षांना या आघाडीत सहभागासाठी निमंत्रणच न दिल्याने सडकून टीकाही होत आहे. महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी न करून घेतल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी टीका केली. शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी एक ट्वीट द्वारे अॅड.आंबेडकर म्हणाले,  “आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत. ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे,” असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ‘इंडिया’च्या हेतूंवरच प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान  जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी केंद्र सरकारने डिनरचं आयोजन केले. मात्र या पाहुण्यांच्या यादीतून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वगळण्यात आले आहे. शनिवारी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या G20 डिनरसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित केलं नाही. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला निमंत्रित करण्यात आलं नाही. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, भारत सरकारचे सचिव आणि इतर प्रमुख पाहुण्यांना डिनरची निमंत्रणे मिळाली आहेत.

यावरून तामिळनाडूतील काँग्रेस नेते मोहन कुमारमंगलम यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जातीभेदाचा आरोप केला. ‘मोदी है तो मनु है’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते पुढे म्हणाले, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू ऋषी महर्षी मनू यांचा वारसा जपत आहेत. महर्षी मनू हे प्राचीन हिंदू ऋषी असून त्यांनी मनुस्मृती लिहिल्याचं म्हटलं जातं. मनुस्मृती हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. हिंदू आचरणासाठी मार्गदर्शक पुस्तक म्हणून मनुस्मृतीची ओळख आहे. पण या पुस्तकातून जातीभेदाचा प्रचार होत असल्याचा आरोप विविध तज्ज्ञांकडून केला जातो.

---------------------------


बाळासाहेब यांची भूमिका रास्त आहे..सर्व बहुजनांनी सनातन धर्मवादी मनुवादी  स्त्रीयांचा कोंडवाडा प्रवृत्ती कायमची खालविली पाहिजे सविधान नको यांना सनातनी धर्मवादी सरकार यांना पाहिजे त्याच वेगाने देश वाटचाल करित आहे शासकीय कार्यक्रमात भगवेधारी नंगेसाधु हा फक्त दलितांना धोका नाही तर सकल बहुजनाला धोका आहे पुन्हा पेशवाई महाराष्ट्रात आणायची आहे मुंबई गिळायची आहे आपल्यातील सूर्याजी पिसाळ फोडले त्यांच्याच खांद्यावर बंधुक ठेवून एक नानाजी फडणविस सारखा सेनापती बनला ज्यांनी शिवाजीला नाकारले शंभूचा वध हाल करण्यासाठी औरंगजेबला मदत केली तुकारामाला संपविले ज्ञानोबाला सपविले अंद्धश्रद्धाळुचे पुरस्करते यांना माञ पुष्पक विमान स्वर्गातून येताना दिसले आणि तुकाराम यांनाच भेटून म्हणाले मी जातो अश्या लोकांचे सरकार महाराष्ट्रात आणन्याचा प्रयत्न होतोय दलितांनी तर शिवासंभाचा बदला घेतला,एकास छपन्न बरोबर आठ्ठाविस हजार पेशवे सेंडीसह चराचरा कापले म्हणून भीमा कोरेगांव घडले .सलाम त्या शूर,शिवासंभाच्या मावळेला तेच खरे मावळे हा ईतिहास अजरामर झाला-
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव गायकवाड   98219 07296

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com