Top Post Ad

कंत्राटी-कामगार पद्धतीतील 'गुलामगिरी हा देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा !

 


"कंत्राटी-कामगार पद्धतीतील 'गुलामगिरी व नव-अस्पृश्यता', हा देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा!"
इंडिया आघाडीच्या संकल्प जनसभेत, राजन राजे यांनी जाहीर केली 'धर्मराज्य पक्षा'ची स्पष्ट, परखड भूमिका....

भाजपच्या केंद्र सरकारच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या, देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA) आघाडीच्या समर्थन-संकल्प जनसभेत बोलताना धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे रोखठोक गरजले की, "हिंदुराष्ट्राची स्थापना करण्यासाठी सुरु असलेला घृणास्पद प्रयत्न आणि त्या हल्ल्यातून संविधान वाचवणं, या मुद्द्यावर अनेकजण बोलत असताना, त्यापलीकडे जाऊन मी असं सांगेन की, *या देशातील कंत्राटी-कामगारपद्धतीतोल नव-अस्पृश्यता, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून, आजच्या आधुनिक भारतातील शेतकऱ्यांची मुलेसुद्धा आता, कंत्राटी-कामगार पद्धतीतील शापित जीवन जगताहेत. कामगार चळवळीत २० ते २५ वर्षे घालवल्यानंतर, प्रत्यक्ष राजकारणात भाग घेत, कंत्राटी-कामगार पद्धतीमधील गुलामगिरी व नव-अस्पृश्यते'विरुद्ध 'धर्मराज्य पक्षा'च्या झेड्याखाली या महत्त्वपूर्ण 'ॲजेंड्या'वर धर्मयुद्ध पुकारलं. त्यातीस भरीसभर असा अन्याय-अत्याचार-शोषणाचा कहर म्हणजे, भारतातील कामगार-कर्मचारीवर्गावर नव्या 'कामगार-संहिते'द्वारे, काळे कायदे लादले जातायत, जे निव्वळ धनदांडग्या भांडवलदारी-व्यवस्थेच्या चांगभल्यासाठी आणि कामगार-कर्मचारीवर्गासह समस्त कामगार-चळवळीला बरबाद करण्यासाठी, गुलामगिरीत ढकलण्यासाठी आहेत. भाजपा-संघाने आधी मुस्लिम-दलितांना 'लक्ष्य' (टार्गेट) केलं, नंतर शेतकऱ्यांना आणि आता कामगारांना 'लक्ष्य' बनवलं जातंय." 

"या सगळ्या घटनाक्रमा मागे, देशातील 'भांडवली-व्यवस्थे'चा महापातकी हात असून, या व्यवस्थेविरोधात आपण उभे राहणार आहोत की नाही?" ...असा सरतेशेवटी थेट सवाल करीत राजन राजे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आगामी २०२४च्या निवडणुकीत भारतातील सर्व विरोधीपक्षांनी आता आपली एकजूट दाखविण्याची ही, शेवटची संधी असून जगाच्या तुलनेत भारतातील कामगारांची संख्या सर्वात जास्त असल्याकारणाने, खऱ्याअर्थाने देशातील कष्टकऱ्यांची ताकद या, मोदी-शहांच्या रासवट भाजपाई राजवटीविरोधात उभी करणे, ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच, आमच्या 'धर्मराज्य पक्षा'तर्फे आम्ही इथे निक्षून सांगत आहोत की, किमान ३००-३२५ जागांवर तरी INDIA आघाडीने एकाला एक उमेदवार द्यावा... उरलेल्या काही जागांवर बहुरंगी निवडणुका लढती खुशाल होऊन जाऊ द्यात... त्यातून INDIA आघाडीतल्या नेमक्या कुठल्या पक्षाची लोकप्रियता जास्त आहे, ते प्रत्येक पक्षाला नीट आकळून येईल आणि ते INDIA आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी पथदर्शक ठरेल... तेव्हा, सध्याच्या मोदी-शहाप्रणित 'अघोषित आणीबाणी'चा मुकाबला करण्यासाठी 'धर्मराज्य पक्षा'सह सर्वांनीच कोणत्याही अटी-शर्तींविना INDIA आघाडीला पाठिंबा द्यावा!"

मुंबईच्या सांताक्रूझ येथील पटूक महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवार, दि. ३० ऑगस्ट-२०२३ रोजी, पार पडलेल्या या जनसभेसाठी राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते सामील झाले होते. त्यात, लवकरच वयाची शंभरी गाठू शकणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी.जी. पारीख, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, शेतकरी नेते राकेश टिकैत, सीपीएम नेते डॉ. अशोक ढवळे, सीपीआय नेते डी. राजा, सीपीआय/एमएल महासचिव दीपंकर भट्टाचार्य, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अबू आझमी, जनता दल खासदार अनिल हेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलम, रिपाई नेते श्याम गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, पत्रकार आणि समाजसेवक डॉ. सलीम खान, सामाजिक कार्यकर्ते डॉल्फी डिसोझा, आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते फिरोझ मिठीबोरवाला (संयोजक), सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून, आपापली मते मांडली. 

यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल 'सत्यपाल मालिक' यांनी, दृकश्राव्य माध्यमातून आपले विचार मांडून, पुलवामा-हल्ल्याच्या निमित्ताने भाजपने केलेल्या निवडणुकीच्या राजकारणाचा भांडाफोड केला. संकल्प-सभेची सुरुवात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी पाठविलेल्या पात्राच्या वाचनाने झाली. सभेतील सर्व वक्त्यांनी इंडिया आघाडीच्या समर्थनार्थ आपापली भूमिका मांडली. देश आणि देशाची राज्यघटना (संविधान) सुरक्षित ठेवायची असेल तर, सर्व लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्षवादी विचारसरणीच्या लोकांना, एकत्र येऊन लढावं लागेल, यावर सर्व वक्त्यांचे आणि उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मतैक्य झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com