हा महाराष्ट्र अत्रेच्या शश्त्रांचा , हा महाराष्ट्र खाडीलकरांच्या एक लाईन वर बदलणारा , अहो बावन्नकुळे आमच्या कुळातले गोविंदराव , त्यांनी एक अग्रलेख केला , हे सरकार पडावे हि तर श्रींची इच्छा , जाणत्या पवारांना विचारून घ्या पुलोदचा जन्म आमच्या एका पत्रकाराच्या अग्रलेखात झालेला , आमच्या एका रकान्यात अनेकांच्या खांद्यावर खादी चढते , रकाने वाढले कि खादीवर कोट चढतात , आम्ही असतोच फाटक्या खिशाचे , बुध्यांक इतरत्र वापरला तर आम्ही तुमचे बा होऊ , मात्र सामाजिक उन्नतीचा किडा वळवळला म्हणून कागद काळे करताना पांढरपेशी जगवण्यात हयाती आमच्या ५२ कुळांच्या गेल्या . या पत्रकार चहा घेऊ म्हटले कि आमची शबनम थांबते , म्हणून विकते असे नाही ना , पत्रकारांना पाकीट द्या , पत्रकारांना जेऊ घाला , तुम्ही तर अजून खाली पाडले पत्रकारांना चहा पाजा , वरून समजले ना म्हणे " काय म्हणायचे दारू का ? माइंड युवर भाषा ..असे आम्ही म्हणणार नाही .
कारण पत्रकार किती ताकतीचा असतो हे टीव्ही आणि पेपरात कळते , तुमचा एक गडी नागडा केला तर लोकशाही बंद करायची वेळ आली , मुळात पत्रकार पुढाऱ्यांच्या अवती भवती असतात मात्र म्हणून आम्ही चहा साठी असतो असे नाही , एकदा चंद्रकांत दादांना विचारा शाई फेकल्याचा व्हिडीओ आमच्याच बहाद्दर गड्याने काढला होता , मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेत सरकारी संवेदना आम्हीच लिक केली बरका , महात्मा फुले आणि सावित्रामाई वर खिदळनारा थेरडा तुमच्याच ५२ कुळातला हे देखील आम्हीच बाहेर काढले , तुम्ही किती हि चहा पाजा आम्ही आमच्या इनबॉक्स मध्ये तुमच्या क्लिप २४ पूर्वी थोडीच रिलीज करणार आहोत . अरे रे भड भड बोलताना विषय सांगायचा राहुन गेला , वाचक म्हणतील आज क्रॉस क्रॉस झाली कि काय, अहो चंद्रशेखर बावनकुळे काल परवा पत्रकारांना चहा पाजायचा , म्हणजे समजले ना म्हणत पत्रकारांना निलाम करताना छापून आले , राज्यभर पत्रकारांनी त्यांना भरपूर चहा पाजला , रोजच्या सारखे विपर्यास केला , वेगळा अर्थ काढला असे उत्तर पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी दिले खरे मात्र , खरे काय ते हेच . दिल्लीत भडव्यांचा बाजार असू शकतो तो महाराष्ट्रात असेलच असे नाही . एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते असा अर्थ माझ्या बोलण्याचा नसतो , ते म्हणजे अहो मी दगडू शेठ च्या दर्शनाला आलो होतो , मात्र बुधवार पेठेत कसे पोहोचलो माहित नाही , लागून असलेल्या गल्लीत साहेबांनी गल्लत झाली असावी , मात्र गल्लत नाही तर आमची जिल्लत आहे , आम्हीच असतो अनेकांच्या कारकिर्दी घडवतो
नियम धाब्यावर बसवणे या शब्दप्रयोगापाठोपाठ आता पत्रकारिता धाब्यावर बसवणे याही शब्दप्रयोगाची मराठी शब्दकोशात भर पडेल विरोधक तर शिल्लक ठेवायचे नाहीतच पण विरोधातल्या बातम्याही नकोत. मुळात पत्रकारांना प्रलोभने आणि दबाव १४ नंतर वाढला , म्हणूनच मोदी सत्तेत आल्या पासून पत्रकारांच्या हत्या सर्वाधिक आहेत , चहा पिऊन गप्प बसलोच असतो तर आमच्या येवढ्या हत्या झाल्याच कशाला असत्या . साहेब आमचे चारित्र्य विक्रेय नाही , नेते तरी विकले जातात किवा वाकवले जातात , पत्रकाराची लेखणी वाकत नाही कारण तिला बाक नसतो , उलट पक्षी तुमच्या पक्षाने आमचे आभार व्यक्त केले पाहिजेत ,
कारण आम्ही तुम्हाला अटलबिहारी वाजपेयी दिले , आम्ही प्रमोद महाजन दिले तुम्हालाच नाही आम्ही सर्व पक्षांना नेते दिले , आम्ही महाराष्ट्राला बाळासाहेब आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्राला शिवसेना दिली , शिवसेनाच काय , बाळासाहेबांच्या बोटाला धरूनच कमळी शहाणी झाली , त्यामुळे आम्हाला चहा पाजण्यापेक्षा आमच्या उपकाराची जान ठेवा . तुमचे शेठ पत्रकारांना हाकलून लावत असताना आम्ही आपले गपगुमान निघून येतो , सवा नऊ वर्षात एकदाही आमचा सामना करायची धमक नसलेल्या कर्णधाराचे तुम्ही सीमेवर उभे असलेले खेळाडू , त्यामुळे आमच्या सोबत फिक्सिंग करण्यापेक्षा २४ च्या सामन्यात १२ वाजू नयेत याची काळजी घ्यावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे . भेटू चहा घेऊ , आणि पैसे आम्हीच देऊ ....
लोक पत्रकार ....
क्रॉसलाईन.....
दैनिक लोकाशा 9613331111
0 टिप्पण्या