कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था काहीशी संथ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जगभरात महागाईही वाढताना दिसत आहे. यासोबतच बेरोजगारीही वाढत असल्याचं चित्र आहे. संपूर्ण जग मंदीच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहे. जागतिक मंदीच्या भीतीमुळे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. भारतातही कोविड महामारी आणि सरकारी धोरणांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे मत अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भारतात महागाई आणि त्यासोबत बेरोजगारीही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. जगभरात बेरोजगारीमध्ये वाढ होत असली तरी महत्त्वाचं म्हणजे कंगाल झालेल्या पाकिस्तानपेक्षाही भारतात बेरोजगारी अधिक वाढली आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक बेरोजगारी असलेला देश दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेत बेरोजगारीचा दर 32.6 टक्के आहे. बेरोजगारीच्या यादीत इराक दुसऱ्या क्रमांकावर आहे. इराकमध्ये बेरोजगारीचा दर 15.55 टक्के आहे. सर्वाधिक बेरोजगारीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बोस्निया आणि हर्जेगोविना हे देश असून येथे बेरोजगारीचा दर 13.3 टक्के आहे. या यादीत अफगाणिस्तान चौथ्या आणि स्पेन पाचव्या क्रमांकावर आहे.
World of Statistics... @stats_feed
Unemployment rate:
- 🇿🇦 South Africa: 32.6%
- 🇮🇶 Iraq: 15.55%
- 🇧🇦 Bosnia and Herzegovina: 13.3%
- 🇦🇫 Afghanistan: 13.3%
- 🇪🇸 Spain: 11.6%
- 🇬🇷 Greece: 10.8%
- 🇺🇦 Ukraine: 10.5%
- 🇮🇷 Iran: 9.7%
- 🇹🇷 Turkey: 9.6%
- 🇨🇴 Colombia: 9.57%
- 🇨🇱 Chile: 8.77%
- 🇮🇳 India: 8%
- 🇧🇷 Brazil: 7.9%
- 🇺🇾 Uruguay: 7.8%
- 🇮🇹 Italy: 7.6%
- 🇫🇷 France: 7.2%
- 🇪🇬 Egypt: 7%
- 🇫🇮 Finland: 6.9%
- 🇦🇷 Argentina: 6.9%
- 🇵🇾 Paraguay: 6.5%
- 🇻🇪 Venezuela: 6.4%
- 🇪🇺 Euro area: 6.4%
- 🇵🇰 Pakistan: 6.3%
- 🇸🇪 Sweden: 6.2%
- 🇵🇹 Portugal: 6.1%
- 🇦🇹 Austria: 6.1%
- 🇩🇪 Germany: 5.7%
- 🇧🇪 Belgium: 5.5%
- 🇨🇦 Canada: 5.5%
- 🇮🇩 Indonesia: 5.45%
- 🇨🇳 China: 5.3%
- 🇸🇦 Saudi Arabia: 5.1%
- 🇵🇱 Poland: 5%
- 🇧🇩 Bangladesh: 4.7%
- 🇵🇭 Philippines: 4.5%
- 🇬🇧 UK: 4.2%
- 🇮🇪 Ireland: 4.1%
- 🇳🇬 Nigeria: 4.1%
- 🇭🇺 Hungary: 4%
- 🇺🇸 US: 3.8%
- 🇦🇺 Australia: 3.7%
- 🇳🇿 New Zealand: 3.6%
- 🇳🇱 Netherlands: 3.6%
- 🇨🇿 Czechia: 3.5%
- 🇳🇴 Norway: 3.5%
- 🇲🇽 Mexico: 3.1%
- 🇷🇺 Russia: 3%
- 🇰🇵 North Korea: 3%
- 🇰🇷 South Korea: 2.8%
- 🇦🇪 UAE: 2.75%
- 🇯🇵 Japan: 2.7%
- 🇩🇰 Denmark: 2.5%
- 🇻🇳 Vietnam: 2.3%
- 🇨🇭 Switzerland: 1.9%
- 🇸🇬 Singapore: 1.9%
- 🇹🇭 Thailand: 1.06%
- 🇳🇪 Niger: 0.5%
- 🇰🇭 Cambodia: 0.36%
- 🇶🇦 Qatar: 0.1%
0 टिप्पण्या