केंद्रीय योजनांचा ढोल मोठय़ा आवाजात वाजविला जात असला तरी योजनांच्या अमंलबजावणीमध्ये झालेल्या चुका आणि ‘ लाभ’ न मिळालेल्या मतदारांचा आधार घेत शिवसेनेच्या वतीने आता ‘होऊ दे चर्चा’ असा नवा राजकीय कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. ठाण्यात या कार्यक्रमाची उत्स्फूर्त सुरुवात झाली. नागरिकांचा याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सरकारच्या कामगिरीचा यावेळी पंचनामाच करण्यात येत असून, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असल्याचे दिसून येत आहे असे कार्यक्रमाचे प्रवक्ते चंद्रभान आझाद म्हणाले. नागरिकांमध्ये गेल्यावर शिवसैनिक विचारतात, ‘पूर्वी गॅसची टाकी किती रुपयांना होती? आता ती किती रुपयांना आहे?’ मग येणारे उत्तर केंद्र सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असते. लोकांपर्यंत लाभ मिळाल्याचा यंत्रणांचा दावा असला तरी प्रत्यक्षात स्थिती वाईट आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी चर्चा घडवून आणल्यास योजना अंमलबजावणीमधील दोष स्पष्टपणे मतदारांपर्यंत पोहोचतील, असे शिवसेनेला वाटत आहे.
ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात १५ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगाकर, कृष्णकुमार कोळी, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा संपर्कप्रमुख संजय ब्रीद, प्रवक्ते चंद्रभान आझाद, सहप्रवक्ते तुषार रसाळ, महिला आघाडी उपजिल्हा संघटक ज्योती कोळी, उपशहर संघटक अनिता प्रभू, अर्चना शाहीर, पौर्णिमा लाड, युवासेना कोपरी पाचपाखाडी विधानसभा युवाधिकारी राजेश पाटील, उपशहरप्रमुख प्रदीप शेडगे, विभागप्रमुख लहू सावंत, दत्ता पागवले, स्वप्नील शिरकर, शाखाप्रमुख सुदेश सावंत, सारंग कदम, सचिन पागवले, मच्छिंद्र हजारे, संतोष डांगरे, जुबेर शेख, विजय दिघे, ओम शेडगे, तुषार चाळके आदी उपस्थित होते.
अच्छे दिन आले का?, आपल्या खात्यात १५ लाख आले का?, मेक इन इंडिया झाले का?, स्कील इंडिया झाले का?, दाऊद व माल्यास फरफटत आणले का?, गंगा स्वच्छ झाली का?, काळे धन परत आले का?, पेट्रोल डिझेल स्वस्त झाले का?, स्मार्ट सिटी झाली का?, डिजीटल भारत झाला का?, शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला का?. तरुणांना रोजगार मिळाला का?, स्त्रियांवरील अत्याचार थांबले का?, भारत विश्वगुरू झाला का? असे अनेक प्रश्न विचारून नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांबाबत जागृत करण्याचे काम या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे.
पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशा नुसार 147कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात 4 जनसंपर्क चौक सभा संपन्न झाल्यास उप जिल्हा प्रमुख ॲड कृष्णा कोळी, संजय घाडीगावकर आणि विधानसभा संपर्क नेते मा. संजय ब्रिद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले,कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली. मोदी सरकारच्या फसव्या योजनांचा वक्त्यांनी पर्दाफाश केला.* होऊ द्या चर्चा* अभियान संपूर्ण राज्यातील जनतेसमोर मांडले जात आहे. मोदी सरकार गो बॅक, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या. जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला. सर्व पदाधिकारी यांचे आभार.- प्रा चंद्रभान आझाद, शिवसेना प्रवक्ते ठाणे शहर
नागरिकांशी थेट संवाद साधणारे "होऊ द्या चर्चा" अभियान कार्यक्रम १४८ ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये जय मल्हार मित्र मंडळ नाका महागीरी कोळीवाडा या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पडला. रविवार १७ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आणि या कार्यक्रमाला शहरप्रमुख प्रदीप शिंदे उप शहरप्रमुख सचिन चव्हाण उप विभागप्रमुख सचिन घोलप व समाजसेवक भूपेंद्रसिंग आठवल यांनी आपली मते नागरिकांसमोर मांडली. कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका मंजिरी ढमाले , विभागप्रमुख संजय भोई उप विभागप्रमुख गणेश मुणगेकर, अजय पवार शाखाप्रमुख परेश कांबळे, रुपेश मोकाशी उपशाखाप्रमुख सुशील भोईर योगेश घुमटकर, चेतन मुणगेकर युवासेनेचे अनिकेत घोलप, कृतीक पाटील, यत्नेश महाडिक, स्वर घोलप ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत घाटवळ, प्रशांत शिंदे, अन्नू पुजारी, अनिल कदम, मंगेश गायकवाड, भूपेंद्र देवळेकर, सचिन लोखंडे, गणेश मयेकर, राकेश गायकवाड, गणेश कांबळे, विष्णू सावंत महिला आघाडीच्या सौ. रजनी बँका, अपर्णा मोकाशी, धनश्री कोळी व नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या