Top Post Ad

आमदारांनी समाजाच्या आरक्षणाकरिता सरकारला धारेवर धरावे


 विद्यमान राज्य सरकारमध्ये आपले चार आमदार आहेत. त्यांनी धनगर आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरावे. त्यांनी सरकारची बाजू मांडू नये. त्या लोकप्रतिनिधींनी समाजाची बाजू मांडल्यास धनगर समाज तुम्हाला डोक्यावर घेईल, 2014 साली आम्ही बारामतीमधील आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी सत्तातंर झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र त्यानंतर कितीतरी कॅबिनेट बैठका झाल्या. परंतु धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले नाही. असा आरोप धनगर समाजाचे नेते राजूशेठ जानकर यांनी केला आहे.

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि चौंडी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खानापूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समिती आणि खानापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचे नेते राजूशेठ जानकर यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर जोरदार एल्गार मोर्चा काढला. या मोर्चामध्ये भाऊसाहेब पाटील, शिवाजी हारुगडे, भरत लेंगरे, किसन जानकर, सुनील मेटकरी, प्रताप कचरे, बाळासाहेब मेटकरी, संदीप मेटकरी, सागर पाटील, पै. राहुल रुपनर, तेजस लेंगरे, बंडू कातुरे, शशिकांत तरंगे, सुभाष मेटकरी, युवराज मेटकरी, सूर्यकांत मेटकरी, रवींद्र ठोंबरे, संजय पाटील, अधिक धडस, शंकर पाटील, दिलीप काळेबाग यांच्यासह समाजबांधव व महिला या सहभागी झाल्या होत्या. सरकारने त्यांचे म्हणणे ऐकल्यास धनगर आरक्षणासाठी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करु. जोपर्यंत धनगर समाजाला एस.टी. प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

मागील काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. त्यांचे आंदोलन चिघळल्यानंतर सरकारने जरांगे यांना आश्वासन देऊन त्यांचे उपोषण मागे घेण्यात यश मिळविले. त्याच दरम्यान राज्यात ओबीसी, धनगर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याने सरकारची कोंडी झाली होती.  यशवंत सेनेच्या माध्यमातून गेल्या 20 दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयाकडे गांभीर्याने लक्ष घालत आता हे उपोषण सोडविण्यासाठी मंत्री गिरीष महाजन चौडीला गेले आणि यशस्वी मध्यस्थी केली. ओबीसी, भटके विमुक्त खात्याचे मंत्री अतुल सावे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे पत्र घेऊन महाजन धनगर समाजातील उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि हे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाज एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहे. मात्र सरकारला अद्याप त्यामध्ये यश आलेले नाही. त्यामुळे आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या निर्धाराने धनगर समाज राज्यात ठिकठिकाणी उपोषण करत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेले चौंडी हे धनगर समाजासाठी महत्त्वाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे. अनेक आंदोलनांची सुरुवात धनगर समाजाने चौंडी येथून केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com