Top Post Ad

कुळेनी पत्रकारांची लायकी काढली....


    किरीट सौमय्याची ती  बातमी दाखवली म्हणुन लोकशाही या मराठी वृत्तवाहिनी वर सूचना प्रसारण मंत्रालयाने बंदी आणली होती. लोकशाही वृत्तवाहिनी यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहे. बंदी उठली असली तरी न्यायालयीन लढाई सुरु राहणार आहे. त्यातच आता , ‘पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असे नवे संवाद तंत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी अहमदनगर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सांगितले. त्यांचे हे विधान एकुण पत्रकारिता सध्या किती आव्हानात्मक स्थितीत आहे हे स्पष्ट करायला पुरेसे आहे... !!   बाकी चिरीमिरीसाठी भाजपची तळी उचलणाऱ्यांना ही सणसणीत थोबाडीत लगावलेली आहे. एका अर्थाने बावनकुळे यांनी लायकीच काढली आहे. 

तंत्रमंत्रवर विश्वास असणाऱ्या भाजपने देशात अनेक साधू, महाराज मंडळींना आमदार, खासदार आणि मुख्यमंत्रीही केले आहे. त्यामुळे तंत्र विद्यामध्ये भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही. अशा भाजपचे राज्याचे म्होरके, नागपूरनिवासी, प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसाठी  ‘चहापाणी’ तंत्र आणलेले आहे. ‘भाजपा विरोधातील बातम्या दाबण्यासाठी  हे तंत्र’ वापरण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दिल्या असून त्याचीच चर्चा सध्या राज्यातील पत्रकारांमध्ये आहे. राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार आहे. येत्या काही महिन्यात आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. विविध सर्वेमधून राज्यातील सरकारविरोधात जनमत असताना भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहे. इव्हीएमच्या जोरावर ही निवडणुकही खिशात घालू असा आत्मविश्वास आसल्यानेच भाजपवाले अशी विधाने करीत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 

‘ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत है पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला... त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या. भाजपसंदर्भात सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या,’ असे स्पष्ट निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.


हे पण वाचा......पत्रकारांची अधिस्वीकृती की पत्रकारितेतील विकृती

---------------



कुळेनी पत्रकारांची लायकी काढली
आयला, "चहा प्यायला" म्हणजे समजलेच असेल नाही का? अशा "चहा"वर खुश होणाऱ्या चाटू पत्रकारांचा सत्कारच करायला हवा. विशेष म्हणजे, या चहापानात काही कमी राहू नये, अशी तक्रार निवारण व्यवस्था सुजय विखेंकडे दिली आहे. आता लोकसभा-विधानसभा निवडणुका होईपर्यंत, असे स्पॉन्सर्ड चहापान करणाऱ्या टुकार पत्रकारांची मज्जा आहे. बाकी या असल्या भिकारचोट आणि फडतूस माणसाची पत्रकारितेच्या 52 पिढ्यांतील, 52 कुळांची लाज काढायची हिंमत होते कशी. या बावनकुळेची 57 कुळे खाली आली तरी, या असल्या दळभद्री चहापानावर मॅनेज न होणारेही काही आहेत या मातीत अजून जिवंत. 52खुळे, पाठवा तुमची ती माणसे आमच्याकडे चहापान ऑफर करायला, नाही पेकाटात लाथ मारून हाणून काढली तर सांगा.
तुम्ही धाब्यावर न्या... आम्ही धाब्यावर बसवतो...
- बेरक्या उर्फ नारद

-----------------------

 ‘आपण सर्वांना आणि सगळं काही विकत घेऊ शकतो, या भंपक भ्रमामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना बाहेर आली आहे. त्यांनी एवढंच सांगावं, हा आविष्कार त्यांचा आहे की त्यांच्या पक्षातील बॉसने असे फर्मान जारी केले आहे?’, माध्यमे तुमच्याच इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून तरी आलेले दिसत नाहीत. कारण असे असते तर त्यांनी तुम्हाला माणिपूरचा आरसा दाखवला नसता बावनकुळेजी. असले धंदे जनमतही बदलत नाही. कर्नाटक निवडणूक त्याचे जवळचे उदाहरण आहे, असा घणाघात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांच्यावर केला आहे. 

---------------

तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का?, असा थेट सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरमधून केलाय.   देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही, या शब्दांत वडेट्टीवार यांनी बावनकुळेवर टीकास्त्र सोडले आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवूनही भाजपविरुद्ध आवाज दबत नाही. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांना दिला आहे.

--------------------------

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स (ट्विटर)वर याबाबत प्रतिक्रीया देताना म्हटले की, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळेजी कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.

 केन्द्रात भा ज प सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य बहाल करण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत यामुळे पत्रकारांची प्रतिमा भाजपाने चक्क धाब्यावर बसविली आहे असा आरोप काँग्रेस नेते तथा प्रवक्ते माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी केली आहे. भा ज प ला सातत्याने विरोध करतात म्हणून गेल्या ३-४ वर्षात दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील टी व्ही चॅनेलच्या प्रसिध्द संपादकांचे राजीनामे घेण्यात आले .संसद भवनात पत्रकार गॅलरी शिवाय ईतर ठिकाणी आता पत्रकारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. संसदेत पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती नंतर, पूर्वी विशेष पास दिला जायचा तोही बंद केला . निर्भिडपणा दाखविणाऱ्या  चॅनेलची मालकीच बदलण्यात आली. आता तर राज्यातील भा ज प च्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून पत्रकारांची प्रतिमा पार "धाब्या" वर बसवली आहे . हेच कॅांग्रेसच्या राजवटीत झाले असते तर अग्रलेख आणि रकाने यांनी पेपर भरून गेले असते.  एवढे सारे होउनही पत्रकार गप्प का ? किती पत्रकारांनी याविरूद्ध आवाज उठविला असे प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केले आहेत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com