ठाण्यातील नागसेननगर झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत शासन उदासिन
आपले सरकार गतिमान सरकार म्हणून सद्याचे राज्यसरकार अनेक जाहिराती करीत आहे. मात्र वास्तवात या गतिमान सरकारने एका सर्व्हे नंबरसाठी दोन वर्षाचा कालावधी घेतला असल्याची माहिती नुकतीच मिळाली आहे. प्रशासनाच्या हा कारभार म्हणजे येथील रहीवाशांना पुनर्वसन प्रकल्पापासून प्रलंबित ठेवण्याचा सरकारी डाव असल्याची टिका येथील रहिवाशांनी केली आहे..
ठाणे कळवा रोड परिसरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमसमोर असलेली नागसेननगर ही वसाहत ठाण्यातील खूप जुनी वसाहत म्हणून गणली जाते. सुमारे ६० वर्षे जुनी असलेली ही वसाहत अद्यापही झोपडपट्टी सुधारणा योजनेपासून वंचित आहे. दोन वर्षापूर्वी अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत या वसाहतीच्या जागेचा सर्व्हे झाला. मात्र त्याची फाईल मागील दोन वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. एका सर्व्हेसाठी लागणारा दोन वर्षाचा कालावधीमुळे येथील रहिवाशी संतप्त झाले आहेत.
दोन वर्षा पूर्वी अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालया मार्फत bondry सर्व होऊन चातूर्सिमा निश्चित करून तसा अहवाल भूमी अधीक्षक कार्यालया कडून जिल्हाधिकारी ठाणे यांना दोन वर्षांपूर्वी पाठविलेला आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात गेले दोन वर्षांपासून सदर फाईल धूळ खात पडलेली आहे. अद्याप पर्यंत सदर भुखंडाला cts नंबर दिलेला नाही.
या झोपडपट्टीत ११०० ते १२०० झोपड्या आहेत. त्यामुळे मा.प्रधान मंत्री यांचं जे स्वप्न आहे की प्रत्येक शहरी गरिबाला स्वतः च घर मिळणार हे सत्यात येणे गरजेचे आहे. चेंदणी कोळीवाडा बस स्थानकापासून सुरु झालेले जोशी बेडेकर महाविद्यालय या वसाहतीपर्यंत पोहोचले आहे. स्टेशनपासून जवळ मुख्य ठाण्याशी जोडलेली ही वसाहत शासनाच्या नियमाप्रमाणे अधिकृत आहे. येथील प्रत्येक रहिवाशाकडे शासकीय-निमशासकीय सर्व सरकारी पुराव्यांचा दस्तावेज आहे. २००८ साली अधिकृतपणे येथील रहिवाशांनी सोसायटी स्थापन केली. त्यानंतर रितसर पुनर्विकास प्रकल्पाकरिता दाखल करण्यात आली. या वसाहतीच्या सभोवतालच्या परिसराचा विकास शासकीय योजनेअंतर्गत झाला आहे. इतकेच नव्हे तर त्या इमारती आता रिन्यूव्हेशन करिता आल्या आहेत. मात्र नागसेननगरचे पुनर्वसनाचे काम इतके वर्ष होऊन अद्यापही रखडलेलेच आहे. यामध्ये बहुतांश करून एस.सी. प्रवर्गातील लोकांचा भरणा असल्याने शासन याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता येथील रहिवाशी करीत आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-ठाणे मार्फत या सर्व झोपड्यांचा पाच वर्षापूर्वीच बायोमॅट्रीक सर्व्हे झाला आहे. मात्र या वसाहतीच्या जागेला सर्व्हे नंबर नसल्याने पुढील कामकाज रखडलेले आहे. दोन वर्षापूर्वी अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत जागेचा सर्व्हे झाला आहे. ती फाईल देखील मागील दोन वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. एका सर्व्हेसाठी दोन येथील रहिवाशी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटा मारीत असून त्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. ठाण्यातील मुख्यमंत्री राज्याला लाभले असताना ठाणेकरांनाच असा त्रास भोगावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली.
0 टिप्पण्या