Top Post Ad

धनगर आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता

 


 धनगर समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण देण्याची मागणी राज्याभरातून होत आहे. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते सुरेश बंडगर हे अहमदनगर मधील चोंडी येथे आमरण उपोषण करीत आहेत. 21 सप्टेंबर रोजी धनगर आरक्षण संदर्भात तोडगा काढण्यासाठी तसेच उपोषण मागे घेण्यासाठी  सहयादी अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत धनगर शिष्टमंडळाची बैठक पार पडली. परंतू, ह्या बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार सकारात्मक आहे, पण निर्णय होत नाही. राज्य सरकारकडून आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.

या चर्चेदरम्यान, राज्य सरकारच्या वतीने आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी आणि संबंधित निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा अवधि देण्याची मागणी करण्यात आली. पण आंदोलकांनी त्यांच्या मागणीचा विरोध केला. सरकारने आतापर्यंत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप वेळ घेतला आहे, आता ते अजून वेळ मागत आहेत. केंद्रात धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षाण दिले जात असून राज्यात मात्र ते दिले जात नाही असं आंदोलकांंनी संगीतले. यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करावं या मागणीसाठी अहमदनगर जिल्हयातील चौंडी येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सातवा दिवस असून धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. अखेर राज्य सरकारला आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे. त्यासाठी मराठा समाजाने चाळीस दिवसांची मुदत दिली आहे. याच दरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणासाठी देखील चौंडी येथे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करीत धनगर समाजाने २० सप्टेंबर रोजी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली. हजारोंच्या संख्येने धनगर समाज पुणे - सातारा महामार्गावर उतरला होता. बकरी, मेंढ्या, घोडे अशा पाळीव जनावरांसह पारंपारिक पेहरावात रस्त्यावर उतरलेल्या धनगर समाजाने शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महामार्ग रोखल्याने साधारणपणे दीड ते दोन तास पुणे सातारा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.


खंडाळ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने वाहतूक सुरळीत करता करता खंडाळा पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. खंडाळ्याजवळील धनगरवाडी येथील माजी उपसरपंच जिजाबा काळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. प्रथम खंडाळा येथील मुख्य चौकात आणि नंतर महामार्गावर धनगर समाज आपल्या मेंढ्या , बकऱ्या आणि घोड्यांसह उतरला होता. पारंपारिक वेशात या समाजाने भैरोबाच्या नावानं चांगभलं, बिरोबा च्या नावानं चांगभलं म्हणून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावे या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे. तरी देखील सरकार आणि आंदोनकर्ते यांच्यातील चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नाही. या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या एका आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्याला पुणे येथे हलवण्यात आले आहे. त्याला आधीच अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत जास्त सुधारणा झाली नव्हती.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com