सरदार पटेलांनी त्याकाळात आरएसएसवर बंदी आणली होती. म्हणजे त्यांना देशप्रेम काय हे कळत होते, केंद्र सरकार डगमगायला लागले आहे. केंद्र सरकार हालायला लागले आहे. मला माझ्या महापौर आणि उपमहापोरांसह इतर सहकाऱ्याचा अभिमान आहे. पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे, नाव लावून कुणी काही करु शकेत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काम करुन जनतेने एखादी उपाधी जनतेने द्यायची अशी तुरळक व्यक्तीपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जळगाव मनपाचे आभारही मानले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्या हवेच्या जोरावर हे फुग्यासारखे हवेत गेले आहेत. त्या फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हा सर्वांना करायचे आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आता भारत बोलावे लागेल कारण आजपर्यंत इंडियाचा गवगवा करणाऱ्यांना इंडियाच्या नावाने खाज सुटायला लागली आहे, पटेलांनी अभिमानाने मराठवाडा स्वातंत्र करुन घेतला. जशी कारवाई सरदार पटेलांनी मराठवाड्यात केली तशी कारवाई करण्याची हिंमत यांच्यात मणिपूरमध्ये दिसली नाही. आणि स्वत: ला पोलादी पुरुष म्हणून घेताय. तुम्ही तकलादू पुरुष आहात अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतू मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा जालनावाला घडविला आहे, जळगावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तिखट भाषेत टीका केली आहे. आम्ही आमची काँग्रेस होऊ देणार नाहीच, पण भाजपा कमळाबाईची पालखी देखील वाहणार नाही, भाजपने सरदार पटेल यांचा पुतळा उभारला. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना चोरले. अगदी माझे वडील देखील त्यांनी चोरले. भाजप आणि संघाला आदर्श व्यक्ती उभे करता आले नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
"मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा माझ्या एका मंत्र्यावर आरोप झाले, मी त्याला राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जायला लावलं होतं. आरोप भयानक होते. राजीनामा घेतला नसता तर शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील तोंड दाखविण्याच्या लायकीचा मी राहिलो नसतो. अरे तू काय करत आहेस, तुझ्या आजुबाजुला अशी माणसं बसली आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोस? महिलांच्या संदर्भात गंभीर आरोप असलेल्यांना मंत्री म्हणून कायम ठेवतोस? असे प्रश्न बाळासाहेबांनी विचारले असते. हे मी कधीच सहन करु शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट तुम्हांला माहित आहे ना? महिलांना देवता माननारे शिवाजी महाराज आणि अशा या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसतोय. तिकडे मणिपू मध्ये जे झालं त्यावर तुमचे बापजादे काही बोलयला तयार नाहीत. कारवाई करत नाहीत, तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा हिंदू खतरेमें अशा घोषणा देत होते. आता यांचे नऊ वर्षे सरकार आहे तरी यांना कश्मीरमधील हिंदू पंडीतांना परत आणता आले नाही. आता तर यांना यांचे सरकार नव वर्षे असताना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतोय हे दुर्देव आहे. मी सत्तेसाठी धडपडतं नाहीये. संजय राऊत म्हणाले देशाचे नेतृत्व...फार मोठी गोष्ट आहे ही, मला अशी स्वप्न पडतं नाहीत, मी देशासाठी लढतोयं आणि तुमच्यासाठी लढतोय. इंडिया आघाडीची मध्यंतरी बैठक झाली, त्याच अध्यक्षपद आपल्याकडे होतं.
देशातील सर्व मोठे नेते तिथे आले होते. माझा पक्ष यांनी चोरलेला, चिन्हं चोरलं तरी 'उद्धव ठाकरे' ला किंमत होती आणि आहे, ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया म्हणून बैठक झाली त्यानंतर गद्दार आणि त्यांना गद्दारी करायला लावली त्यांनी होर्डिंग लावले. शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावला, 'मी शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही.' बरोबर आहे. पण शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही, अरे पंचवीस-तीस वर्षे सोबत असल्याने जशी शिवसेनेची भाजप झाली नाही तशीच शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. भाजप जेंव्हा मेहबुबा मुफ्तीं सोबत बसले होते तेंव्हा त्यांचा पीडीपी झाला होता का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
0 टिप्पण्या