Top Post Ad

येऊरला एअरफोर्सच्या मैदानावर हेलिपॅड ?


   येऊरच्या पायथ्याशी असलेल्या एअरफोर्सच्या मोकळ्या मैदानावर कायमस्वरूपी हेलिपॅडची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.  या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. केंद्रामध्ये भाजपा -शिवसेना महायुतीचे सरकार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपले अतिशय मित्रत्वाचे संबंध असून त्यांच्याकडे एक ठाणेकर म्हणून ही मागणी केली तर ते मान्य करतील, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. काही वेळेस होणारे इमरजन्सी लँडिंग, राजकिय सभा, वाहतूक कोंडी समस्येमुळे एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये रूग्णाला नेण्यासाठी एअर अँब्युलन्सची सुविधा तसेच इतर अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी या हेलिपॅडचा फायदा ठाणेकरांना होऊ शकतो,  ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोखरण रोड नं. १, २ तसेच घोडबंदर रोडवर मोठ-मोठ्या उत्तुंग इमारती होत आहेत. पुढील १० ते १५ वर्षांमध्ये ही संख्या दुप्पटीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत त्वरीत विचार करावा असे सरनाईक यांनी सुचवले आहे. 

ठाणे शहरामध्ये रेमंड या बंद पडलेल्या टेक्सटाईल कंपनीच्या जागेवर विजयपथ सिंघानिया यांनी शाळेच्या बाजूला स्वत:करिता ही सुविधा निर्माण केलेली आहे. या सुविधेचा फायदा सिंघानिया परिवाराबरोबर सर्व राष्ट्रीय पक्षांना तसेच काही महत्वाच्या घटनांसाठी होत असतो. मात्र  रेमंड व्यवस्थापनाने टेक्सटाईल्स कंपनी बंद करून त्याठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यास सुरूवात केली असून काही वर्षांनंतर त्याठिकाणी असलेल्या हेलिपॅडच्या जमिनीवरही प्रकल्प उभे राहू शकतात. अशा वेळेस ठाणे जिल्ह्यात व शहरामध्ये दुर्घटना किंवा काही महत्वाच्या घटना घडल्यास हेलिपॅडची सुविधा मिळू शकणार नाही, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. 

 पोखरण रोड नं. १ मधील येऊरच्या पायथ्याशी असलेल्या एअरफोर्सचे मोकळे मैदान आहे. संरक्षण खात्याची ही जागा उपलब्ध असून या ठिकाणी संरक्षण खात्याचे फायर रेंज आहे, तर काही ठिकाणी झोपड्यांचे अतिक्रमण झालेले आहे. या मोकळ्या मैदानावर जर कायमस्वरूपी हेलिपॅडची सुविधा निर्माण केली तर त्याचा फायदा येऊर येथील संरक्षण दलाच्या कामासाठी होऊन तेथील जागेचे संरक्षण होईल. अतिक्रमणापासून देखील त्याचा बचाव होईल. तसेच काही वेळेस होणारे इमरजन्सी लँडिंग, राजकिय सभा, वाहतूक कोंडी समस्येमुळे एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये रूग्णाला नेण्यासाठी एअर अँब्युलन्सची सुविधा तसेच इतर अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी या हेलिपॅडचा फायदा ठाणेकरांना होऊ शकतो,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com