Top Post Ad

शेतकरी कामगार पक्ष I N D I A आघाडीमध्ये

 

I N D I A या आघाडीमध्ये आता शेतकरी कामगार पक्षाला सहभागी करून घेण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली. यामुळे राज्यातील आघाडीची ताकद अनेक पटीने वाढणार आहे.  I N D I A आघाडीची तिसरी बैठक या महिनाअखेरीस मुंबईत होणार आहे. तिच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. आज या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेकापला इंडिया आघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव मांडला व याला कोणाचा विरोध असेल असे मला वाटत नाही असे प्रतिपादन केले. इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी या प्रस्तावाचे सहर्ष स्वागत केले. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी तर हा प्रस्ताव तात्काळ स्वीकारण्याचा आग्रह धरला व यामुळे मुंबईत होणारी आगामी बैठक अधिक जोमाने पार पडेल असे मत व्यक्त केले. 

गेल्या काही महिन्यांमध्ये शेकापने डाव्या व पुरोगामी पक्षांची प्रागतिक आघाडी उभी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या आघाडीत तेरा पक्ष सहभागी आहेत. आपण या प्रागतिक आघाडीचे प्रतिनिधी म्हणून आजच्या बैठकीला हजर आहोत असे भाई जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रागतिक आघाडीतील स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनाही या आघाडीत सहभागी करून घेतले जायला हवे अशी सूचना त्यांनी केली. त्याला I N D I A आघाडीतील सर्व पक्षांनी अनुकूलता दर्शवली आहे. 

प्रागतिक आघाडीतील दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, सीपीआय (एम. एल) लिबरेशन, समाजवादी पक्ष, यांच्यासारखे पक्ष याआधीच इंडिया आघाडीत सहभागी आहेत. आता शेकापच्या सहभागामुळे महाराष्ट्रात I N D I A अधिक मजबूत होईल अशी भावना सर्वच नेत्यांनी बोलून दाखवली व शेकापचे जोरदार स्वागत केले. शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एस.व्ही जाधव व कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे हेदेखील भाई जयंत पाटील यांच्यासमवेत आजच्या बैठकीला हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com