Top Post Ad

आपण खरा इतिहास वाचला पाहिजे- भालचंद्र नेमाडे


   काही महिन्यांपासून राजकीय वादाचे कारण ठरलेल्या औरंगजेब व ज्ञानवापी मशिदीबाबात भाष्य करताना आपण खरा इतिहास वाचला पाहिजे असे वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक  भालचंद्र नेमाडे यांनी केले.  औरंगजेबाविषयी चुकीची माहिती सांगितली जाते. ते तसे नव्हते. काशी-विश्वेश्वर येथील पंडितांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या 2 राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्या नाहीत. चौकशी केल्यानंतर समजले की, तेथील पंडित तरुण बायकांना भूयारी मार्गतून नेऊन भ्रष्ट करायचे. औरंगजेबाला हे समजले तेव्हा त्याने ज्ञानवापीची मोडतोड केली असे नेमाडे म्हणाले   मुंबईच्या दादरमध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे शतकोत्तरी रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हा खरा इतिहास असल्याचे नेमाडे यांनी स्पष्ट केले. 

त्यावेळी बहुतांश मुस्लिम राजांना हिंदू राण्या असायच्या. तेव्हा आजच्या सारखा हिंदू - मुस्लिम वाद नव्हता. मुघल बादशहा शहाजहानची आई हिंदू होती. औरंगजेबालाही 2 हिंदू राण्या होत्या. त्या काशी विश्वेश्वराला गेल्या होत्या. त्या पुन्हा परत आल्या नाही, असे भालचंद्र नेमाडे म्हणाले. छावणीतील काही लोकांनी ही गोष्ट औरंगजेब यांच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध घेतला. त्यात काशी विश्वेश्वरामध्ये एक भुयार होते, या भुयारातून मंदिरातील पंडित बायकांना नेऊन भ्रष्ट करायचे, ही गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने तिथे तोडफोड केली. तसेच ही अशी माणसे नकोत म्हणून त्याने काही जणांना ठारही केले. म्हणूनच पुढे इतिहासात त्याला हिंदूद्वेष्टा म्हणून हिणवले गेले, असे नेमाडे म्हणाले.

 शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान होता. याऊलट औरंगजेबाचा मुख्य सरदार जयसिंग हिंदू होता, अशी बाबही नेमाडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. औरंगजेबाच्या दरबारात निम्म्याहून अधिक हिंदू सरदार होते. औरंगजेबानेच भारतातील सती प्रथा सर्वप्रथम बंद केली. सध्या बायका भ्रष्ट केल्याच्या व मुली पळवून नेल्याच्या अनेक बातम्या येतात. त्यामुळे इथे रहायचे कसे? हा प्रश्न आहे. सद्यस्थितीत बाहेर जे सुरू आहे, ते सर्व खोटे आहे. त्यामुळे तरुणांनी पुस्तके वाचून खरे काय ते समजून घ्यावे. तुम्ही ग्रंथ वाचली, तरच तुम्हाला सत्य समजेल. कुणाचे काहीही ऐकू नका. वाचा. त्यानंतरच तुम्हाला कोण खरे बोलतो? हे समजेल, असेही भालचंद्र नेमाडे यावेळी म्हणाले.

 मुघल बादशहा औरंगजेबाने देशातील सतीप्रथा बंद केल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आता त्यांनी पेशव्यांच्या चालीरितींवर बोट ठेवले आहे. नानासाहेब पेशवे जाईल तिकडे 8 ते 10 वर्षांच्या मुलीची मागणी करत होते. या मुली त्यांना कशासाठी लागायच्या हे मी सांगत नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे आणखी एक वाद होण्याची शक्यता आहे.

भालचंद्र नेमाडे म्हणाले की, पंजाबच्या गोविंदपंत बुंधेले यांना नानासाहेब पेशवे यांचे पत्र यायचे. त्यात ते त्यांना 8 ते 10 वर्षांच्या 2 शुद्ध व सुंदर मुलींची तयार ठेवण्याचे निर्देश देत होते. 40 ते 42 वर्षांचे नानासाहेब पेशवे या मुलींना मारून टाकायचे की काय हे मला माहिती नाही. या मुली त्यांना का लागायच्या हे मी सांगणार नाही. पण पेशवे खूप वाईट होते. आपण त्यांच्या तावडीतून सुटले हे खूप चांगले झाले. गोविंदपंत बुंधेले यांना मिळालेली पत्रं मी वाचलेली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी या प्रकरणी जोडली.


भारतीय जनता पार्टीच्या कायदेशीर सल्लागार विभागाने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र भाजपाचे सोशल मीडिया कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख अॅड. अशुतोष दुबे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. “भालचंद्र नेमाडे या लेखकाविरोधात मी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमाडे यांनी हिंदू ब्राह्मणांना भडकवणारं, ज्ञानवापी प्रकरणी हस्तक्षेप करणारं आणि जनतेला चिथावणी देणारं भाषण केलं आहे. या विधानातून त्यांनी सार्वजनिक सलोखा बिघडवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत योग्य ती कारवाई करावी.”    असे अॅड. दुबे ट्वीटमध्ये म्हणाले की
संभाजी भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com